१२ वी परीक्षा केंद्र परिसरात संशयीत फिरणाऱ्या १० युवकांवर पोलिसांची कारवाई…
उपसंपादक – रणजित मस्के
नंदुरबार : बारावी परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्र परिसरात विनाकारण फिरून मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दहा जणांविरुद्ध आहे. जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्र परिसरात कारवाई करण्यात आली.

सध्या १२ वीच्या परीक्षा सुरू आहेत. पेपर सुरू असताना केंद्र परिसरात मनाई आदेश लागू आहे. असे असतांना काहीजण विनाकारण परीक्षा केंद्र परिसरात फिरून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्रास होईल अशा पद्धतीने आला आहे.
वर्तन करीत असतात. शिवाय कॉपी पुरविण्याचा देखील त्यांच्याकडून प्रयत्न असतो. अशा युवकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत
पोलिसांनी विसरवाडी येथे चार, नंदुरबार येथे तीन, धानोरा येथे दोन, तर खोंडामळी येथे एकावर कारवाई केली. याबाबत त्या त्या पोलिस ठाण्यात संबधित युवकांविरुद्ध मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com