बनावट लायसन्स बनविणाऱ्या सायबर कॅफे चालकावर कारवाई नंदुरबारातील प्रकार ; दोघांविरुध्द गुन्हा दाखल…
उपसंपादक – रणजित मस्के
नंदुरबार: खोटे दस्तऐवजद्वारे बनावट वाहन परवाना (लायसन्स) बनवून देणाऱ्या नंदुरबारातील एका सायबर कॅफे चालकावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात सायबर कॅफे चालकासह एकाविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.
नंदुरबार येथील बस स्थानका जवळील
बाबारी सायबर कॅफेचे चालक मुकेश पवार यांनी खाटे दस्तऐवजाद्वारे भादवड गावातील पांडुरंग रविंद्र पाटील यांचे बनावट वाहन परवाना असलेले लायसन्स बनवून दिले. बनावट लायसन्स खरे असल्याचे भासवून दोघांनीही शासनाची फसवणूक केली आहे. याबाबत आरटीओ कार्यालयातील सहाय्यक पोलिस वाहन निरीक्षक रोहन नितीन जाधव यांनी
नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पांडूरंग रविंद्र पाटील (रा. भादवड, ता. नंदुरबार) बाबारी सायबर कॅफे चालक मुकेश पवार या दोघांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६५. ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. (तपास पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर करीत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com