पोलादपूर माटवण येथे दारूच्या नशेत पुन्हा एका ५५ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या…

0
Spread the love

प्रतिनिधी-राकेश देशमुख

पोलादपूर : शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी पुन्हा एकदा पोलादपूर तालुक्यातील माटवण येथे 55 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.

सविस्तर माहिती अशी की मयत राजेश पांडुरंग गायकवाड यांना दारूचे व्यसन होते व त्यांनी नैराश्यपोटी आज सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान आपल्या घरामध्ये साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

घटनास्थळी पोलादपूर पोलीस दाखल झाले असून सदरचा मृत्यूदेह पोलादपूर येथील सरकारी रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे.

पोलादपूर पोलीस ठाण्यात सदरच्या मृत्यूची आकस्मित मृत्यू अशी नोंद झाली असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवांलदार रुपेश पवार हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट