बनावट चावीच्या आधारे घरफोडी करणा-या एका आरोपी कडुन व विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन डोंबिवली पोलीसांनी २,१०,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल केला हस्तगत…

उपसंपादक – रणजित मस्के
मुंबई ( डोंबिवली )
दिनांक :- १५/०१/२०२३ रोजी रात्री १०.०० वा ते दि १८/०२/२०२३ दुपारी ०१.०० वा. चे दरम्यान यातील फिर्यादी नामे सौ पुजा अरुण शृगारे वय २४ वर्षे, व्यवसाय घरकाम, याचे राहते घरी:- नेहरू मैदान सर्वोदय गोल्ड बिल्डींग, रुम नं १०४. पहीला मजला, नेहरु मैदानाजवळ, डोंबिवली पूर्व येथील घराची व किचनमध्ये असलेल्या लोखंडी कपाटाची बनावट चावी तयार करुन आतमध्ये प्रवेश करून कपाटाच्या लॉकरमधील एकूण २.१०,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरटयाने समतीशिवाय लबाडीने चोरून नेले. वरुन डोंबिवली पोलीस ठाणे गु.र.क:- ६५ / २०२३ कलम ३८०, ४५४, ४५७ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सपोनि सानप, पोहवा: ५०३ / वाघ, पोहवा १३०७ / सरनाईक, पोअ ३४०६ / राठोड, पोअ:- ८४१३/सांगळे यांनी डोंबिवली पोलीस ठाणे गु.र.क ६५/२०२३ कलम: – ३८०, ४५४, ४५७ भादंवि मधील तपासाच्या अनुशंगाने फिर्यादी सौ पुजा अरुण शृगारे वयः – २४ वर्षे, व्यवसाय- घरकाम, रा. नेहरू मैदान सर्वोदय गोल्ड बिल्डींग, रुम नं १०४, पहीला मजला, आचरेकर यांचे घरी भाडयाने नेहरू मैदानाजवळ, डोंबिवली पूर्व यांचेकडे चौकशी केली असता त्यांचे घरात नेहमी येणारी त्यांची बहीण नमीता प्रभु शृंगारे व त्यांचा भाचा नामे प्रेम प्रभु शृगारे वय:- १६ वर्षे राह. ओमसाई आनंदकृपा ३ रा मजला, सागर्ली गाव, डोंबिवली पूर्व यांचेकडे चौकशी केली. त्यातील प्रेम प्रभु शृगरि वय – १६वर्षे याचेकडे चौकशी दरम्यान त्याने त्याचे मित्र अनिकेत दादु खंडागळे याचे मदतीने फिर्यादी यांचे राहते घराची, कपाटाची व लॉकरची बनावट चावी तयार करुन त्याआधारे फिर्यादीच्या राहते घरात घुसून कपाटातील लॉकर मधुन दागिने चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे मार्फतीने पाहीजे आरोपी अनिकेत दादु खंडागळे हा तांत्रिक मदतीच्या आधारे खंबाळपाडा, ठाकुर्ली पुर्व येथे असल्याची माहीती मिळाल्यावरुन उपलब्ध पोलीस पथकाच्या मदतीने सापळा रचुन त्यास ताब्यात घेवुन त्यांचेकडुन नमुद गुन्हयातील घरफोडी करुन चोरी केलेले एकूण २,१०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -३, कल्याण श्री. सचिन गुंजाळ सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग श्री. सुनिल कुराडे साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन सांडभोर सो, पोनि सरडे सो, पोनि / तडवी सो यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, सपोनि बळवंत भराडे, पोहवा :- ५०३ / विशाल वाघ, पोहवा- १३०७ / प्रशांत सरनाईक पोअ ३४०६ / शिवाजी राठोड, ८०४१३ / नितीन सांगळे, पो.अं निलेश पाटील, पो.ना.४५७/दिलीप कोती पो.ना रायते यांनी कामगिरी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com