स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई सातारा शहरातील मटका जुगार व्यावसायिक समीर कच्छी यांचे जुगार अड्ड्यावर छापा टाकून १६,२६,०७०/- रुपयाचे जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त.

उपसंपादक -रणजित मस्के

सातारा : – श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील मटका जुगार व्यावसायिकांचेवर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार व पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली दोन स्वतंत्र पथके तयार करून त्यांना सातारा जिल्हयातील मटका जुगार व्यावसायिकांचेवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले.
दि.१९/०२/२०१३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय गोपनिय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, सातारा शहरातील मटका जुगार व्यावसायिक शमीम सलीम शेख उर्फ समीर की हा त्याचे काळेवरती सैदापूर सातारा येथील राहते परामध्ये कल्याण, मेन, मिलन, राजधानी, टाईम नावचा जुगार चालवित आहे. प्राप्त झालेल्या बातमीमधील माहिती त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार व पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे पथकांना देवून नमुद ठिकाणी जावून कारवाई करण्याचे आदेश त्यांना दिले. त्याप्रमाणे नमुद पथकांनी प्राप्त माहितीच्या ठिकाणी जावून छापा टाकला असता मटका जुगार व्यावसायिक शमीम सलीम शेख उर्फ समीर कचडी हा त्याचे १९ साथिदारांसह कल्याण, मेन, मिलन, राजधानी, टाईम नावचा जुगार चालवित असताना मिळून आल्याने त्यांना ताच्यात घेवून त्यांचे कब्जातून १६,२६,०७०/-रुपये किमतीचे जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करून त्यांचे विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाणे गु.र.नं.७४/२०१३ म. जु.अ.क.४, ५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गजें, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, वसंत जाधव, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, अतिश पाडगे, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेवले, प्रविण फडतरे, मंगेश महाडीक, अमोल माने, अजित कर्णे, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, मोहन पवार, शिवाजी भिसे, रोहित निकम, विशाल पवार, प्रविण पवार, पृथ्वीराज जाधव, केतन शिंदे, पीरज महाडीक, मोहसिन मोमीन, मपुर देशमुख, मोना निकम, राधा जगताप, गिरीष रेड्डी, नारनवर यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com