एसटी आंदोलनाबद्दल मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांनी घेतली रा.काॅ.पा.अध्यक्ष श्री. शरद पवारसाहेब यांची भेट

मुंबई: शुक्रवार दिनांक 12 नोव्हेंबर 2021रोजी सिल्व्हर ओक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री.राजसाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री.शरद पवारसाहेब यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
आंदोलनकर्ते एसटी कामगारांचा संप लवकरात- लवकर मिटावा आणि कामगारांच्या वेतनविषयक मागण्यांबाबत समाधानकारक तोडगा निघावा यासाठीच हि भेट होती.
सुमारे एक तासभर चाललेल्या चर्चेत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करणे आणि 7 व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करणे हे मुख्य मुद्दे होते.
या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री.बाळा नांदगावकर, श्री. नितीन सरदेसाई, मनसे सरचिटणीस श्री. कीर्तिकुमार शिंदे ,सचिव श्री. हर्षल देशपांडे, मनसे राज्य परिवहन कामगार सेनेचे कार्याध्यक्ष श्री.विलास अकलेकर व सरचिटणीस श्री. मोहन चावरे साहेब उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com