सातारा पोलीसांतर्फे एका आगळ्या वेगळ्या उंच भरारी योजनेचे आयोजन…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा : सातारा जिल्हयातील बालगुन्हेगारी रोखणेसाठी तसेच गुन्हेगारीकडे आकर्षीत होत असलेले युवक यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करून त्यांना शिक्षेऐवजी त्यांच्या कल्याणासाठी व विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार, शिक्षण, कौशल्य विकास, खेळ, रोजगार मुलांचे कल्याण व विकास अशा तरतुदी करणेसाठी उंच भरारी योजने अंतर्गत त्रिसुत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यातील पहीला टप्पा कौशल्य विकास व नोकऱ्या (रोजगार) सुरु करण्यात आला असून १५ ते २५ या वयोगटातील युवक व त्यांचे पालक यांचेशी संवाद साधुन त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दिनांक १६/०२/२०२३ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश किंद्रे यांचे अध्यक्षतेखाली कोरेगाव विभागातील कोरेगाव, पुसेगाव, रहिमतपुर, वाठार या पोलीस ठाणे हददीतील विधीसंघर्ष बालक तसेच गुन्हेगारीकडे आकर्षीत होत असलेले युवक यांना बोलावुन श्री. प्रशांत पाटील, संचालक, आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) यांनी हजर असलेल्या युवक व युवतींना स्वयंरोजगाराची माहीती दिली व त्यांचे फॉर्म भरुन घेतले तसेच मेघावी स्किल युनिव्हर्सिटी यांचे प्रवेश सल्लागार श्री. राकेश कांबळे यांनी त्यांचे युनिव्हर्सिटीची माहीती देवुन नोकरी मिळणेबाबत मार्गदर्शन करून तसे फॉर्म भरुन घेतले. सदर कार्यक्रमास एकुण ७० युवक व युवतीनी त्यांचे पालकांसह सहभाग नोंदविला. युवक व युवती यांनी भरुन दिलेल्या फॉर्मप्रमाणे त्यांना आवड असलेल्या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजीत आहे.

दिनांक १७/०२/२०२३ रोजी अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर यांचे अध्यक्षतेखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश देशमुख यांनी बडुज विभागातील बडुज, दहिवडी, आँप, म्हसवड या पोलीस ठाणे हददीतील विधीसंघर्ष बालक तसेच गुन्हेगारीकडे आकर्षीत होत असलेले युवक यांना बोलावुन श्री. प्रशांत पाटील, संचालक, आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) यांनी हजर असलेल्या युवक व युवतींना स्वयंरोजगाराची माहीती दिली व त्यांचे फॉर्म भरून घेतले तसेच मेघावी स्किल युनिव्हर्सिटी यांचे प्रवेश सल्लागार श्री. राकेश कांबळे यांनी त्यांचे युनिव्हर्सिटीची माहीती देवून नोकरी मिळणेबाबत मार्गदर्शन करून तसे फॉर्म भरुन घेतले.

सदर कार्यक्रमास एकुण ६९ युवक व युवतीनी त्यांचे पालकांसह सहभाग नोंदविला. युवक व युवती यांनी भरुन दिलेल्या फॉर्मप्रमाणे त्यांना आवड असलेल्या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजीत आहे.

आज अखेर उंच भरारी योजने अंतर्गत पहिला टप्पा कौशल्य विकास व रोजगार अंतर्गत एकुण १३९ युवक व युवती व त्यांचे पालक यांचेशी सकारात्मरित्या चर्चा करण्यात आलेली आहे. तसेच या योजने अंतर्गत सातारा जिल्हयातील उर्वरित कराड, सातारा, वाई, पाटण व फलटण या उपविभागातील १५ ते २५ या वयोगटातील विधी संघर्ष बालक, गुन्हेगारी बाधीत क्षेत्रातील युवक व त्यांचे पालक यांचेशी संवाद साधुन त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट