घरातुन बेपत्ता झालेल्या 12 वर्षाच्या 3 मुलांना शोधण्यात डोंबिवली पोलीसांना मोठे यश…

उपसंपादक-रणजित मस्के
डोंबिवली :दि १३/०२/२०२३ डोंबिवली पोलीस ठाण्यात फिर्यादीचे नाव पत्ता गुड्डु तुल्ला हासमी वय ४७ वर्षे. धंदा सायकल रिपेअरींग रा.तुकाराम नगर, साई निकेतन बाळ, रूम नं.१२, डोंबिवली पूर्व मो.क्र ८४३३६७२७८७ यानी दिलेल्या फिर्यादीनुसार
दि.१५/०२/२०२३ रोजी सकाळी १०:३० वा. सुमारास फिर्यादी यांची मुलगी हुसना गुड्डु हासमी वय १३ वर्षे रा. तुकाराम नगर, साई निकेतन चाळ, रूम नं.१३. डोंबिवली पूर्व हि व तिचे सोबत अयान जब्बउल्ला खान वय १२ रा. विर सावरकर चाळ रूम नं. १२. स्माशन भुमी जवळ, कोपर, ठाणे २) विशाल मुकेश कहारे वय १३ रा. श्रीराम सदर बंगलो, नरेश केणे चाळ, आयरेगाव, डोंबिवली पूर्व हे लाल बहादुर शास्त्री शाळा, आयरेगाव, डोंबिवली पूर्व येथून कोठेतरी निघुन गेले, त्यांचा शोध घेतला असता ते मिळून न आल्याने फिर्यादी यांची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणाकरीता फिर्यादी यांचे मुलीचे व मुलांचे अपहरण केले आहे. म्हणून फिर्यादी यांची अज्ञात इसमांविरुद कायदेशिर डोंबिवली पोलीस ठाण्यात तकार केली.
तपासीक अंमलदार
पोउपनिरी / सुनिल पाटील नेम डोंबिवली पोलीस ठाणे. पोउपनिरी/सुनिल पाटील नेम डोंबिवली पोलीस ठाणे यानी सदर घटनेचा शोध घेण्यात सुरूवात केली.

डोंबिवली पोलीस ठाणे भादवि कलम 363 अन्वये 12 वर्षे वयाच्या 3 मुलांचा सहायक पोलीस निरीक्षक श्री.सानप,श्री. भराडे व तपास पथक यानी तांत्रिक माहिती व सीसीटीव्हीच्या आधारे आसनगांव येथुन शोधुन काढुन त्याना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देऊन सुखरूप देऊन अति उल्लेखनीय असे कार्य केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com