नाशिक क्राईम युनिट १ ने गुटखा नेणारा टेम्पो जप्त करून आरोपीतास केले अटक …

उपसंपादक -रणजित मस्के

नाशिक : – लामरोड येथून विक्रीसाठी गुटखा नेणारा टेम्पो अडवून अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. ८७ हजारांचा पानमसाला आणि सुगंधित तंबाखू हस्तगत केला आहे. याप्रकरणी टेम्पोचालक संशयित मधुसुदन देवीदास चौधरी (वय २८) याला अटक करुन नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात • आला आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात अमली पदार्थांच्या साठ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार अवैधरित्या तंखाबूची वाहतूक होत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. सहायक निरीक्षक हेमंत नागरे यांनी छापा मारण्याचे आदेश दिले. अंमलदार संजय ताजणे, देवकिसन गायकर या कर्मचाऱ्यांनी लामरोडवरील लोटस हॉटेलजवळ एमएच १५ ईजी ८५१२ या क्रमांकाचा टेप्मो रोखला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा मिळाल्याने चालकाला नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात दिले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com