फलटण येथील सराईत गुन्हेगार सुरज बोडरे व त्याच्या १२ साथीदारांविरुध्द मोक्का कायद्यांतर्गत कारवाई…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा : श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रीत करुन दहशत निर्माण करून आर्थिक व इतर फायद्याकरीता संघटीतपणे गुन्हे करणा-या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना सूचना दिल्या आहेत. फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. ८४१ / २०२२ भा. दं. सं. कलम २८६ ३९५ २१७, २०७

अधिनियम ४ २५ अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख सुरज बोडरे व त्यांच्या १२ साथीदारांचे विरुद्ध पोलीस ठाणेत खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, जबर दुखापत घडवुन आणण्याच्या प्रयत्नासह दरोडा, जबरी चोरी, अपनयन, जबर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवुन मारहाण, शिवीगाळ, दमदाटी, अपहरण, आर्म अॅक्ट अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल असून टोळी प्रमुख सुरज बोहरे यानं त्याचं टोळीची दहशत पसरविण्यासाठी फलटण तालुक्यातील इतर गुन्हेगारी टोळीतील सदस्यांना एकत्र करुन दहशत पसरविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी नमुद टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करून आरोपींचेविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाई करीता पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्फतीने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. नमुद प्रस्तावास मा. श्री सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी मंजुरी दिली असून नमुद गुन्ह्यात मोक्का कायद्याची कलमे लावून या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री तानाजी बरडे, फलटण उपविभाग, फलटण यांच्याकडे देण्यात आला आहे.

माहे नोव्हेंबर २०२२ पासून एकुण ४ मोक्का प्रस्तावामध्ये ४४ इसमांविरुध्द मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई केली आहे. तसेच भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांचे विरुध्द हदपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कठोर करवाया करणेत येणार आहेत.
मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण उपविभाग, श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा श्री धन्यकुमार गोडसे, पोलीस निरीक्षक, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, पो. उ. नि. सागर अरगडे, पो.उ.नि. गणेश माने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अमित सपकाळ फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार संजय राऊत, वैभव सूर्यवंशी, अमोल जगदाळे अभिजित काशिद, अजय कडेकोट, स्वप्निल खराडे यांनी मोक्का कारवाईकरीता सहभाग घेतला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com