70 अपदा मित्रांनी घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे…

0
Spread the love

प्रतिनिधी-रेश्मा माने

महाड: आपदा मित्र प्रशिक्षण 2023 या अपदा मित्रांच्या दुसऱ्या टीमने आज बारा दिवसाचे निवासी प्रशिक्षण पूर्ण केले असून महाड तालुक्यासह पोलादपूर, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील तरुण – तरुणींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता या प्रशिक्षणात रोप रॅपलिंग, बोटिंग, प्रथम उपचार, पूर परिस्थितीत बचाव तंत्र तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले.

या प्रशिक्षणासाठी नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक एन. के. म्हात्रे व शशिकांत शिरसाट यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पार पडले आहे .

आज “सांगता” कार्यक्रमाकरिता महाड प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, महाड तहसील सुरेश काशीद, महाड नगरपालिका मुख्याधिकारी श्री रोडगे साहेब, रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. सागर पाठक
आपत्ती व्यवस्थापन विभाग श्रीमती आसावरी पाटील व पहिल्या प्रशिक्षणातील अपदा मित्र परिवार उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट