महाड म्हाप्रळ पंढरपूर मार्गावर खड्डेच खड्डे प्रवाशांसह वाहनचालकांचा जीवघेणा प्रवास …

0
Spread the love

प्रतिनिधी-रेश्मा माने

महाड: अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधात ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा !

महाड म्हाप्रळ पंढरपूर. रस्त्याच सध्या रुंदीकरण करण्याचे काम सुरु असून गेली कांही महिने ठप्प झालेले काम अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत पुन्हा एकदा चालू असले तरी महाड ते वराठी, महाप्रळ पर्यंत खड्डेमय रस्त्यातून जीवघेणा प्रवास नागरिकांना करावा लागत आहे. या भागातून ये जा करत असलेल्या अवजड वाहनांमुळे यात अधिकच भर पडली असून नागरिकांच्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करत असून अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मुजोरपणा बाबत ग्रामस्थ आक्रमक झाले असून या भागातील ग्रामस्थांनी आंदोलनाची तयारी चालू केली आहे.

म्हाप्रळ पंढरपूर हा राज्यमार्ग . क्रमांक १५ हा महामार्ग महाडजवळून गेला आहे. महाड तालुक्यातील वराठी पासून सुरवात होवून तालुक्यातील शिरगाव, पुढे खरवली, माझेरी करत पुणे जिल्हा हद्दीत त्याचा प्रवेश होतो.
महाड हद्दीतील रस्त्याची देखभाल दुरूस्ती ही महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होती मात्र आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग महामार्ग विभागाकडे वर्ग झाला असून आता हा मार्ग ९६५ डी.डी. या नवीन क्रमांकाने ओळखला जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाने या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी चार वर्षापूर्वी सुरवात केली. मात्र कोरोना संक्रमण वाढल्याने हे काम बंद ठेवले गेले होते. त्यातच ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते त्याच ठेकेदाराने किल्ले रायगड मार्गाचे देखील काम घेतले होते. हे काम अर्धवट ठेवल्याने सदर ठेकेदाराला दिलेले काम संपुष्टात आणले आणि महाड -महाप्रळ -पंढरपूर मार्गाचे काम देखील सदर ठेकेदाराकडून काढून घेण्यात आले. सद्या हे काम अक्षय कंस्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे गेली अनेक महिने हे काम ठप्प होते. यामुळे जागोजागी केलेले खोदकाम, मोऱ्यांची कामे,. यामुळे हा रस्ता प्रवाशांना वाहन चालवताना धोकादायक ठरत आहे.

महाड तालुक्यातील शिरगाव, पासून पुढे तुडील गावापर्यंत जुना डांबरी रस्ता कांही अंशी बरा होता मात्र त्याची देखभाल दुरुस्ती संबंधित ठेकेदाराने . तात्पुरती मलमपट्टी करून केल्याने हा संपूर्ण रस्ता खड्डेमय बनला आहे. यामुळे नेमका खड्डा कोणता चुकवायचा असा प्रश्न वाहनचालकापुढे पडला आहे. या महामार्गाचे काम करणारे अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी स्थानिक ग्रामस्थांना अथवा ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने रस्त्या जवळील मालकी जमिनीतील माती काढणे आंब्याची काजूची झाडे परस्पर तोडणे इत्यादी प्रकार या कंपनी व्यवस्थापनाकडून वारंवार घडत आहेत तसेच खैरे पाटबंधारे विभागातून या परिसरातील गावांना जोडणारे नळ पाणीपुरवठा योजना देखील याच रस्त्यांमधून जाते ती देखील वारंवार तोडण्याचे काम या कंपनी व्यवस्थापनेकडून होत असल्याने स्थानिक ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत .

या परिसरातील ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे करून देखील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे महाड येथील कार्यालय ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने या परिसरातील ग्रामस्थ रस्त्यावरील धुळीच्या साम्राज्यापासून ते रस्त्यावरील खड्डे वारंवार होणाऱ्या अपघात यामुळे त्रस्त झाली आहेत . ज्या पुढार्‍यांना येथील जनतेने निवडून दिले ते देखील ठेकेदाराचे बगल बच्चे झाले असल्याने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे वारंवार तक्रारी करून देखील अधिकारी, ठेकेदार दुर्लक्ष करत आहेत यामुळे ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

रत्नागीरी जिल्हयाला हा रस्ता जोडला गेला असल्याने रत्नागीरी जिल्हयातील सिमेवरील गावांचा अधिक संबध महाडला असल्या कारणाने बाजारपेठ आणि शिक्षण आदी कारणास्तव या रस्त्यावर कायम वर्दळ असते. प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांबरोबरच पुणे, रायगड, आणि मुंबईकडे जाणाऱ्या एस.टी.च्या गाडया देखील या परीसरातून ये जा करत असतात. या मार्गावर महाड तालुक्यातील गोमेंडी, वराठी, जुई, चिंभावे, तुडील, सव, रावढळ, महाप्रळ आदी गावे येतात. या परीसरातील नागरीकांचा थेट संबध हा महाड शहराशी येत असल्याने प्रतिदिन वाहनांची ये जा मोठी असते. त्यात या विभागात वामणे, हे कोकण रेल्वेचे स्थानक देखील आहे. रखडलेल्या कामामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. रुग्णांना महाड मध्ये आणणे देखील या रस्त्यामुळे कठीण होवून बसले आहे. प्रवाशांना हा मार्ग सुस्थितीत ठेवणे ठेकेदाराचे काम असताना देखील त्याची देखभाल दुरुस्ती केलेली नाही. यामुळे महाड जवळील शिरगाव पासून पुढे प्रचंड खड्डे पडले आहेत.

याबाबत स्थानिक महामार्ग विभागाचे अधिकारी मात्र जाणीवपूर्वक कानाडोळा . करीत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता असून बेजाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे.
या मार्गावर वाहनचालकांना आणि समान्य नागरिकांना रोजच मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट