नाशिकमध्ये शहाद्यात पोलिसांसाठीच्या आधुनिक व्यायामशाळेचे महानिरीक्षकांच्या हस्ते झाले उद्घाटन…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नंदुरबार : पोलिस कर्मचारी व त्यांच्या पाल्यांसाठी तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जे. शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

शहरातील जुन्या ठाण्याच्या इमारतीत ही व्यायामशाळा तयार करण्यात आली आहे. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याने दिवसातून कमीत कमी एक तास व्यायाम करावा. व्यायामाने अनेक किरकोळ व्याधी सहज होतात.

नियमित व्यायामाने शरीर व मन फ्रेश असते. शहादा पोलिस ठाण्यामार्फत उभारण्यात आलेल्या सुसज्ज व्यायामशाळेत नवीन तंत्रज्ञानाचे साहित्य व्यायामासाठी

ठेवल्याने त्याचा उपयोग पोलिस व त्यांच्या पाल्यांनादेखील होणार असून, नियमित व्यायाम करण्याचे आवाहन महानिरीक्षक पाटील यांनी केले.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, शहादा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, म्हसावदचे निवृत्ती पवार, सारंगखेडाचे राजेंद्र शिरसाठ, धडगावचे ईशामुद्दीन पठाण, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, राहुल पाटील, भगवान कोळी, गणेश पवार, संदीप आरक, माया राजपूत, छगन चव्हाण, अभिजित अहिरे, आदींसह अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट