सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई शिराळा पोलीस ठाणे हद्दीत खुनासह दरोडा टाकणारी टोळी जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक -रणजित मस्के

सांगली ( शिराळा ) : पोलीस स्टेशन शिराळा

अपराध क्र आणि कलम

गुंरंन ०८/२०२३ भा.द.वि.स कलम ३०२.३९४.३९७.३८०.३४ गु.दा.

फिर्यादीचे नाव

रविंद्र बापु गलुगडे वय-३४ धंदा- ३४ रा. निगडी ता.शिराळा जि. सांगली

माहिती कशी प्राप्त झाली

दिनांक. १७.०१.२०२३ रोजीचे १७.५३ वा मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली कारवाई करणारे अधिकारी आणि अमंलदार अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी पदमा कदम मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार (शिराळा पो ठाणे ) सपोनि संदीप शिंदे सुनिल चौधरी, उदयसिंह माळी, बिरोबा नरळे, संदीप गुरव, सागर लवटे, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, संतोष गळवे, विक्रम खोत, जितेंद्र जाधव, शुभांगी मुळीक, कॅप्टन गुंडवाडे, प्रकाश पाटील अकुंश ढवळे, अमोल कोतकर, सत्यजीत पाटील, अजय बेंद्रे, सुधीर गोरे.

अटक वेळ दिनांक

दिनांक ०८८०२.२०२३

आरोपीचे नाव पत्ता

१. मग या अशोक ऊर्फ अजीतबाबा काळे वय १९ रा, येवलेवाडी ता वाळवा जि सांगली
२. तक्षद ऊर्फ स्वप्नील पप्या काळे वय.२६ रा. कार्वे ता.वाळवा जि.सांगली
३. गोपी ऊर्फ टावटाव त्रिशुल ऊर्फ तिरश्या काळे वय १९ रा. ऐतवडे खु. ता. वाळवा जि.सांगली

जप्त मुद्देमाल

मग या अशोक ऊर्फ अजीतबाबा काळे, तक्षद ऊर्फ स्वप्नील पप्या काळे, गोपी ऊर्फ टावटाव त्रिशुल ऊर्फ तिरश्या काळे यांच्या कब्जातून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

१) ३,००,०००/- रुपये किंमतीचे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने

२) १०,६००/- रुपये रोख रक्क्म

३) ६०,०००/- रुपये किंमतीची मोटार सायकल
असा एकुण – ३,७०,६००/- रू किंमतीचा मुद्देमाल

उघडकीस आलेले गुन्हे

१) शिराळा पोलीस ठाणे भाग ५ गु.र.नं ०८/२०२३ भा.द.वि.स कलम ३०२,३९४,३९७,३८०,३४

२) कासेगाव पोलीस ठाणे भाग ५ गु.र.नं ०१/२०२३ भा.द.वि.स कलम ४५७,३८० ३) इस्लामपुर पोलीस ठाणे भाग ५ गु.र.नं ७५ / २०२३ भा.द.वि.स कलम ४५७,३८०

गुन्हयाची थोडक्यात हकीकत

दिनांक १७.०१.२०२३ रोजी शिराळा पोलीस ठाणे हद्दीत निगडी गावचे शिवारात वस्तीवरील श्री सदाशिव दादु सांळुखे व हिराबाई सदाशिव सांळुखे हे वयोवृद्ध दांम्पत्य राहत असले त्यांचे शेतातील घरावरती रात्रीचेवेळी अज्ञात चोरटयांनी त्यांचे शेतातील वस्तीवरील बंद घराचा दरवाजा तोडुन घरात प्रवेश करून घरामध्ये झोपेत असलेले हिराबाई साळुंखे यांच्या अंगावरील सोन्याचे दागीने जबरदस्तीने काढून घेताना विरोध केल्याने अज्ञात इसमांनी सदाशिव सांळुखे व हिराबाई यांना कोणत्यातरी हत्याराने दोघांना डोकीत जबर मारहाण करुन गंभीर जखमी करून दागीने चोरून नेले, यातील जखमी हिराबाई सांळुखे यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या गुन्हयाची शिराळा पोलीस ठाणे येथे जबरी चोरी करत गंभीर जखमी केले बाबत चा गुन्हा दाखल झाला आहे.

या गुन्हयाचे घटनास्थळी मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी पदमा कदम मॅडम, यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, शिराळा पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांना सदरचा जबरी चोरी करण्यासाठी केले खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांनी
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था. गु.अ. शाखा यांना सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणणेकरीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनि संदिप शिंदे व सोबत पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.

त्याप्रमाणे वरील पथकाने गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन गुन्हयाचा तपास चालू केला. सदर घटनेचे घटनास्थळ हे अतिशय डोगराळ व दुर्गम भागात असलेने स्थानिक पातळीवर कौशल्यपुर्ण तपास करीत पथकाने अभिलेखावरील गुन्हेगार, जेल रिलीज झालेले व जामीनावरील गुन्हेगार तसेच आजुबाजुच्या जिल्हयामधील अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या टोळया यांचे हालचालीवर लक्ष केंद्रीत करून अहमदनगर, सोलापुर, सातारा जिल्हयात छापे मारून चेक केले होते. गुन्हयाचे अनुषंगाने माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकातील अंमलदार सुनिल चौधरी, उदयसिंह माळी, संकेत कानडे यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा मगन्य काळे व त्याचे साथीदार यांनी केला असुन ते लक्ष्मी फाटा इस्लामपुर रोड परिसरात असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. त्या मिळाले माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनि संदीप शिंदे व पथकाने लक्ष्मी फाटा इस्लामपुर रोड परिसरात सापळा लावुन संशयित इसम
१) मग या अशोक ऊर्फ अजीतबाबा काळे वय १९ रा, येवलेवाडी ता वाळवा जि सांगली
२) तक्षद ऊर्फ स्वप्नील पप्या काळे वय २६ रा. कार्ये ता. वाळवा जि.सांगली
३) गोपी ऊर्फ टावटाव त्रिशुल ऊर्फ तिरश्या काळे वय १९ रा. ऐतवडे खु. ता. वाळवा जि.सांगली यांना ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्यांच्या अंगझडती मध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम, एक मोटर सायकल असा मुद्देमाल मिळुन आला. त्यांचेकडे मिळुन आले सोन्याचे दागिने व रोख रकमेबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचे सोन्याचे दागिने हे शिराळा येथील रात्रीचे वेळी निगडी येथील एका शेत वस्तीवरील घरावरती दरोडा टाकुन घरातील लोकांना मारहाण करून सोन्याचे दागिने लुटून चोरी केले होते त्यातील असल्याचे कबुल केले आहे. तसेच त्यातील काही दागिने हे त्यांनी काही दिवसापुर्वी कासेगांव शिराळा हद्दीत रात्रीचे वेळी। घरफोडी करून चोरलेले दागिन्यापैकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीचे अंगझडतीमध्ये गुन्हयात चोरी गेलेला ३,१०,६००/- मुद्देमाल व ६०,०००/- रू किंमतीचा गुन्हयात वापरलेले दुचाकी वाहन असे एकुण ३,७०,६००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गुन्हयातील नमुद आरोपी नामे मगन्या अशोक काळे हा अभिलेखावरील गुन्हेगार असुन त्याचेवर कासेगांव, आष्टा व इस्लामपुर पोलीस ठाण्यात जबरी चोरी/ घरफोडी सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्हयामध्ये अजुन २ आरोपी निष्पन्न झाले असुन त्यांचा शोध सुरु आहे. गुन्हयाचा पुढील तपास शिराळा पोलीस ठाणे करीत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट