आपले गांव हॉटेल मालकांचा प्रामाणीकपणा जेवण करुन विसरलेले सोन्याचे सुमारे ७ लाखाचे दागीने पोलीस ठाण्यात जमा. उंब्रज पोलीसांनी संबंधीतांचा शोध घेवुन केले परत…
उपसंपादक – रणजित मस्के
सातारा : दिनांक ०२.०२.२०२३ रोजी रात्री नेहेमीप्रमाणे आपलं गांव या हॉटेलमध्ये जेवण करणेसाठी गि-हाईकांची मोठी गर्दि होती. काही लोक जेवण करुन जात होते. काही येत होते. रात्री १० वा. चे सुमारांस गोव्याहून मुंबईकडे निघालेले एक कुटूंब जेवण करणेसाठी आपले गांव हॉटेल, शिवडे, उंब्रज ता. कराड येथे येवून जेवण करुन ते कुटुंब त्यांचे गाडीने निघुन गेले. काही वेळाने गि-हाईक कमी झाल्यानंतर आपले गांव हॉटेल मालकांचे लक्षात आले की, टेबलला कुणा गि-हाईकाची दागीन्यांची बॅग टेबलला विसरली आहे. हॉटेल मालकांनी ती बॅग तेथुन घेवुन हॉटेलमध्ये त्यावेळी असणारे गि-हाईकांकडे चौकशी केली असता हजर गि-हाईकांकडुन प्रतिसाद मिळाला नाही म्हणुन ती दागीन्यांची बॅग आणुन त्यांनी उंब्रज पोलीस स्टेशनला जमा केली होती.

उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांचे मार्गदशनाखाली उंब्रज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. अनिल पाटील, पो. अंमलदार श्री. दिपक जाधव, श्री. सचिन देशमुख, कराड शहर पोलीस ठाण्याकडील पो. हवालदार राजेंद्र देशमुख, महिला पोलीस नाईक चव्हाण यांनी सदरचे दागीन्यांचे बॅगेच्या मालकांचा शोध घेवून त्यांना उंब्रज पोलीस ठाण्यात बोलावुन त्या बॅगेतील वस्तूंची ओळख पटवून पोलीसांनी त्यांच्या ताब्यात दिली आहे.
श्री. अशफान अयाज मुलाणी, त्यांची पत्नी सौ. शर्मिन अशफान मुलाणी वगैरे रा. चेंबुर, मुंबई हे कुटूंब गोव्याहून मुंबईला जाताना आपलं गांव या शिवडे, उंब्रज येथील हॉटेलात जेवण करणेसाठी थांबुन जेवण करुन मुंबईकडे रवाना झाले होते. त्यांचेकडील दागीन्यांची बॅग त्यांचेकडुन हॉटेलात विसरली गेली होती त्या दागीन्यांचे बॅगमध्ये सोन्याचा नेकलेस, ४ पाटल्या, दोन अंगठया असा सुमारे १४ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने अंदाजे ७ लाख रुपये किंमतीचे ते हॉटेलमध्येच विसरले होते. ते सोन्याचे दागीन्यांसह बॅग हायवेलगतच्या हॉटेल आपलं गांव च्या मालकांनी प्रामाणीकपणे आणुन पोलीस ठाण्यात जमा केली होती. त्या बॅगमालकांचा पोलीसांनी कसोशीने शोध घेवून तपास करुन शोध घेवून खात्री करुन त्यांचेच ताब्यात दिलेले आहे. अलिकडील काळात माणसातला प्रामाणीकपणा हरवत चालल्याचे काळात अशा प्रामाणीक पणाचे उदाहरणे कमीच आहेत. हॉटेलमध्ये सर्रासपणे आपले सामानाची जबाबदारी स्विकारली जात नाही तशा प्रकारचे फलकही कित्येक हॉटेलमध्ये पहावयास मिळतात. हॉटेल आपलं गांवचे मालक श्री. विजयसिंह व्यंकटराव जाधव, श्री. दिलीपराव आत्माराम पाटील, श्री. बाळासाहेब राजाराम ढवळे व श्री. अर्जुन कोळी (सर) यांनी दाखविले प्रामाणीकपणा बद्दल त्यांचे उंब्रज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अजय गोरड व सर्व पोलीसांनी कौतुक केले असुन समाजमाध्यमातुनही त्यांचे प्रामाणीकपणाबद्दल कौतुक होत आहे. आपलं गांव या हॉटेल मालकांचे या प्रामाणीकपणाबद्दल समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com