महाडच्या दादली पुलावरून उडी मारल्याने मनोरुग्ण महिलेचा पाण्यात बुडून गुदमरून मृत्यू…
प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड: महाड शहराजवळील दादली पुलावरून एका मनोरुग्ण महिलेने सावित्री नदीपत्रात उडी मारल्याने तिचा पाण्यात बुडून गुदमरून मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना शनिवार दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी दुपारच्या सुमारास घडली.
सुवर्णा मारुती महाडिक वय 55 वर्षे राहणार जाकमातानगर, पोलादपूर, जिल्हा रायगड असे मयत महिलेचे नाव असून तिला अधूनमधून वेड्याचे झटके येत होते असे पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून समजते.
सदर घटना समजतात महाड शहर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल होऊन साळुंके रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून ग्रामीण रुग्णालय महाड येथे नेण्यात आले होते.यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार श्री पवार हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com