महाड एमआयडीसीतील प्रिव्ही स्पेशालिटी कंपनीला भीषण आग…

प्रतिनिधी-रेशमा माने
महाड: आगीमध्ये जीवित हानी नाही, कंपनीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान ..!

महाड एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. आज 12 वाजताच्या दरम्यान महाड एमआयडीसीतील नामांकित प्रीव्ही स्पेशालिटी युनिट टू या कंपनीला भीषण आग लागली आहे.
आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून कंपनीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनास्थळी पोलीस प्रशासन व अग्निशामक दल दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली आहे याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग लागल्यामुळे कंपनीतील सर्व कर्मचारी वर्गाला कंपनी बाहेर पाचारण करण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com