बंगल्याच्या मागे खुन करुन पुरुन ठेवणाऱ्या आरोपीला सातारा तालुका पोलीसानी ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा: सातारा पोलिसांची कारवाई मौजे वादे गावातील कांताताई नलवडे यांचे बंगल्याचे मागे खुन करुन पुरुन ठेवलेल्या स्त्रीच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस सातारा तालुका पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

दि. ०४/०१/२०२३ रोजी सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाडे गावात कांताताई नलवडे यांच्या बंगल्याच्या पाठिमागे एक अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह आढळून आला होता. त्या अनुशंगाने सातारा तालुका पोलीस ठाणे गु.र.नं.०४/२०२३ भा.द.वि.सं.कलम ३०२, २०१ गुन्हा दाखल करणेत आला होता. सदर गुन्ह्याचे तपासामध्ये अनोळखी मृतदेहाची प्रथम ओळख पटवून तिचे नाव मंगल शिवाजी शिंदे, वय ५० वर्षे, रा. संगम माहुली ता.जि. सातारा असे असल्याचे निष्पन्न करुन आरोपी निष्पन्न करणेत आला. मा. श्री समीर शेख, अधीक्षक सो. सातारा व मा. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा तसेच श्री. मोहन शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा विभाग, सातारा यांनी सदर खुनाच्या गुन्हयात निष्पन्न आरोपी यास अटक करणेबाबत सुचना देवन यांचे मा. पोलीस निरीक्षक विश्वनित घोडके यांचे अधिपत्याखाली सातारा तालुका पोलीस ठाणेस विशेष वेगवेगळी पथके तयार केली होती.

त्यानुसार वेगवेगळी पथके वेगवेगळ्या शहरांमध्ये रवाना झालेली होती. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळे बातमीदार पुणे, मुंबई अशा शहरामध्ये सतर्क केले होते. परंतु सदरचा आरोपी चकवा देत असलेने तो मोबाईल वापरत नसल्याने व कोणाचेही संपर्कात येत नसलेने अथक परिश्रम करुनही पोलीसांना त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर दिनांक २३/०१/२०२३ रोजी विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पोलीस ठाणे यांना बातमी प्राप्त झाली की, आरोपी हा पुण्यामध्ये लपुन बसलेला आहे. त्यावेळी तात्काळ एक पथक पुणे येथे पाठवून कौशल्यपूर्वक तपास करुन सापळा रचुन आरोपीस पुण्यातून ताब्यात घेवून अटक केले आहे.

सदर कारवाईमध्ये मा. श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सो, सातारा, मा. श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सो. सातारा, मा. श्री मोहन शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा विभाग, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक श्री. दळवी, पो.ना. संदिप आवळे, निलेश जाधव, मालोजी चव्हाण, नितीराज थोरात, राहुल राऊत, सचिन पिसाळ व चालक गिरीष रेड्डी यांनी सहभाग घेतला.

या कारवाईत सहभागी असले अधिकारी व अंमलदार यांचे मा. श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सो, सातारा. मा. श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा यांनी अभिनंदन केले आहे. आरोपीचे नाव विकास हिरामण सकट वय 38 वर्ष मूळ रा . कलेढोण तालुका खटाव जिल्हा सातारा हल्ली राहणार फुलेनगर तालुका वाई जिल्हा सातारा असे आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट