महाड एमआयडीसीतील हार्टझ ऑरगॅनिकला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बंदची नोटीस…
प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड : महाड अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमधील हार्ट्झ ऑरगॅनिक या प्रदूषणकारी कारखान्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखाना बंदची नोटीस बजावली आहे. कारखान्यातील रसायन मिश्रित पाणी असलेला टँकर तळोजा येथे पकडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती प्रदूषण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी इंदिरा गायकवाड यांनी दिली आहे.
या कारखान्यातील रसायन मिश्रित सांडपाणी घेवून जाणारा टँकर तळोजा येथे पकडल्यानंतर टँकर मालकाने हार्ट्झ ऑरगॅनिक मधून सदर सांडपाणी उचलले असल्याचे सांगितले यामुळे प्रादेशिक कार्यालयाच्या आदेशानुसार हा कारखाना बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली असून कारखान्याचा विद्युत पुरवठा आणि पाणीपुरवठा देखील बंद करण्यात आला आहे.
या कारखान्यावर यापूर्वी देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली होती. ब्रोमिन उत्पादन करणारा हा लहान कारखाना जरी असला तरी त्यामध्ये सुधारणा होत नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी अशी सातत्याने मागणी होत होती. त्यानूसार आता या कारखान्यावर सदर घटनेनंतर प्रदूषण नियंत्रण कायदा कलम यू/एस ३३(ए ) कलम १९७४, यू/एस ३१ ए कलम १९८१ नुसार बंदची कारवाई करण्यात आली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com