तब्बल ११९ तोळे सोने लांबवणाऱ्या चोरट्यांना अटक..आठ लाखांसह ७१ तोळे सोने हस्तगत हिंजवडी पोलिसांची दमदार कामगिरी…
उपसंपादक – रणजित मस्के
पिपंरी चिंचवड: पिंपरी घराची रेकी करून घरातून ११९ तोळे सोने आणि दोन लाख ९० हजारांची रोकड लांबवणाऱ्या सराईत टोळीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७१ तोळे सोने आणि आठ लाख रुपये रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.

1)अजय सर्जा नानावत (वय २७, रा. मुळशी),
2)कन्हैया विजय राठोड (वय १९, रा. पाथरगाव, ता. मावळ),
3)आशा राजूभाई ठक्कर (वय ४०, रा. अहमदाबाद, गुजरात) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मोहन, अनिरुद्ध योगेश राठोड उर्फ नानावत आणि त्यांचे दोन साथीदार यांचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपी अजय नानावत याच्यावर ३२ गुन्हे तर ठक्कर वर ६ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे ज्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ डिसेंबर रोजी पोपट चांदरे (वय ४४, रा. सुसगाव) यांच्या घरात अज्ञातांनी चोरी करून ११९ तोळे दागिने आणि दोन लाख ९० हजार रोकड चोरून नेली. हिंजवडी पोलिसांनी ५७ पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासले. त्यातील
दोघेजण हिंजवडी फेज तीन येथे बापूजी बुवा मंदिरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार दोघांना सापळा लावून ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केली असता यांची टोळी असून यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्यात तब्बल ४८ ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे उघड झाले. चोरी केलेला माल आरोपी अहमदाबाद येथील आशा ठक्कर या महिलेला विकला त्याबदल्यात तिने ८ लाख रुपये आरोपींच्या बँक खात्यात जमा केले. ठक्कर ही पुण्यात येणार अशी माहिती मिळताच पोलिसांनी तीला पुण्यातून ताब्यात घेतले. तिच्याकडून पोलिसांनी ६६ तोळे सोने जप्त केले. पोलिसांनी या तपासात अजय कडून ४ तोळे सोने व ८ लाख रुपये व ठक्कर थ्री लेअर रेकी चोरटे घरफोडी करण्यासाठी एकाच परिसरातील काही बैठी घरे हेरून त्यांची तीन वेळा रेकी करत असत. दुपारी घर हेरून गेल्यानंतर काही वेळाने येऊन पुन्हा अंदाज घेत घर बंद असल्याचे पाहून एक ते दीड तासाने पुन्हा येऊन घर बंदच असल्याबाबत तसेच आसपासच्या परिसराची पुन्हा रेकी करायचे त्यानंतर रात्री घरफोडी करण्यासाठी येऊन पुन्हा अजुबाजूच्या परिसराची पाहणी करून घरफोडी करायचे.
चांदेरे यांच्या घरावर आरोपींनी दोन दिवस पाळत ठेऊन घरफोडी करण्यापूर्वी अनेकदा रेकी
करून ६६ तोळे सोने असे ७० तोळे सोने व ८ लाख रुपयांची रोकड जप्त केली.
ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक अजीत पाटील, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापुसाहेब धुमाळ, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडित सुभाष गुरव, सोनाली ढोणे, ऋती सोनावणे, शालीनी वचकल यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com