सातारा शिरवळ पोलीसांची दमदार कामगिरी… आवडीसाठी दुचाकी चोरणारी टोळी केली जेरबंद..! टोळीतील दोन युवकांना अटक तर दोन अल्पवयीन युवकांचा समावेश…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

खंडाळा : शिरवळ व सातारा शहर पोलीस ठाणेहद्दीमध्ये आवडीकरिता व समाज माध्यमांवर प्रसिध्दीकरिता दुचाकी चोरणा-या टोळीला जेरबंद करण्यात शिरवळ पोलीसांना यश आले आहे. यामध्ये दोन युवकांना अटक करण्यात आली असून टोळीमध्ये शिक्षण घेणा-या दोन अल्पवयीन युवकांचा समावेश आहे.

शिरवळ ता. खंडाळा गावचे हद्दीतील आझाद गल्ली याठिकाणी घराच्या पार्किंगमधील दुचाकी क्रमांक एम.एफ.बी. ९८५४ ही दुचाकी २९ डिसेंबर २०२२ रोजी मध्यरात्री १२.३० वा. चे सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेलेची फिर्यादीनुसार शिरवळ पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सहा. पोलीस उपनिरिक्षक अनिल बारेला हे करीत आहे. दरम्यान संबंधीत दुचाकी चोरटे हे वाई तालुक्यातील भुईंज पोलीस ठाणे हद्दीतील असल्याची माहिती शिरवळ पोलीस निरिक्षक श्री. नवनाथ मदने यांना गोपनीय माहितीद्वारे मिळाली.

त्यानुसार श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा श्री बापू बांगर अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, व तानाजी वरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग फलटण यांचे मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक श्री. नवनाथ मदने, सहा. पोलीस उपनिरिक्षक अनिल बारेला, पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर, सुनिल मोहरे, नितिन महांगरे, दत्तात्रय धायगुडे, प्रशांत वाघमारे, मंगेश मोझर यांच्या पथकाने भुईंज पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरिक्षक रमेश गर्जे व पोलीस अंमलदार विकास देशमुख, रविंद्र वर्णेकर मदतीने उडतरे येथील युवकाला ताब्यात घेतले. यावेळी युवकाकडे चौकशी केली असता दुचाकी चोरीमध्ये आणखी महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या दोन अल्पवयीन युवकांसह एकूण चौघांचा समावेश असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार केंजळ ता. वाई येथील दोन अल्पवयीन व चोरीतील केंजळ ता. वाई येथील २१ वर्षीय युवकाला ताब्यात घेतले. यावेळी संबधीतांनी आवडीसाठी व समाजमाध्यमांवर प्रसिध्दीसाठी शिरवळ व सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील दोन दुचाकी चोरल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. या दुचाकी चोरी प्रकरणी योगेश संदिप बाबर (वय १८ वर्ष ०२ महिने, रा. उडतरे ता. वाई), ओंकार संदिप बाबर (वय २१ वर्षे रा. केंजळ ता. वाई) या दोन युवकांना अटक करण्यात आली आहे. यावेळी संबधीत टोळीकडुन शिरवळ व सातारा पोलीस ठाणे हद्दीतील दोन दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

सदरील कारवाईश्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा श्री बापू बांगर अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, व तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग फलटण यांचे मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक श्री. नवनाथ मदने, सहा. पोलीस उपनिरिक्षक अनिल बारेला, पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर, सुनिल मोहरे, नितिन महांगरे, दत्तात्रय धायगुडे, प्रशांत वाघमारे, मंगेश मोझर यांच्या पथकाने भुईंज पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरिक्षक रमेश गर्ज व पोलीस अंमलदार विकास देशमुख, रविंद्र वर्णेकर यांचे मदतीने शिरवळ पोलीसांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट