दोन वर्षापासून दरोड्याची पुर्वतयारी या गुन्ह्यात पाहिजे असलेला रेकॉर्डवरील आरोपीस सातारा तालुका पोलीसांनी केले जेरबंद…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा : सातारा तालुका पोलीसांची अति उल्लेखनीय कारवाई….
मा. श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सो, सातारा व मा. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेले व फरारी आरोपी पकडण्याबाबत दिनांक २६/१२/२०२२ ते दिनांक ०९/०१/२०२३ रोजी पर्यंत विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिलेले होते.

त्याप्रमाणे श्री. मोहन शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा विभाग, सातारा यांचे अधिपत्याखाली सातारा तालुका पोलीस ठाणेस विशेष पथक तयार केले.
दिनांक १४/०१/२०२३ रोजी विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पोलीस ठाणे यांना बातमी प्राप्त झाली की, पाहिजे असले रेकॉडवरील आरोपी नामे शंकर उर्फ रोनिक डिया भोसले रा. जिहे ता जि सातारा हा जिहे गावचे हद्दीत आला असलेबाबत माहिती मिळालेने त्यांनी लागलीच पाहिजे फरारी पथकास सोबत घेवून मिळालेबातमी प्रमाणे मौजे जिहे गावी गेले तेथे आरोपीचे राहते घरी तो छापा घालुन त्यास जागीच पकडून सातारा तालुका पोलीस ठाणे गु.र.नं १३/२०२० भा.द.वि कलम ३९९ या गुन्ह्यात अटक करणेत आलेली आहे.

सदर कारवाईमध्ये मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सो, सातारा, मा. श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा, मा. श्री मोहन शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा विभाग, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पोलीस ठाणे, पो.हवा दादा परीहार, पोना राहूल राऊत, सचिन पिसाळ, समीर महांगडे, पो. शि सतीश पवार यांनी सहभाग घेतला असून कारवाईत सहभागी असले अधिकारी व अंमलदार यांचे मा. श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सो, सातारा, मा. श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com