आंतरराज्य दरोडा टोळी वर सांगली गुन्हे अन्वेषण शाखा व सांगली शहर पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई…
उपसंपादक- रणजीत मस्के
सांगली : पोलीस स्टेशन सांगली शहर गुरन ८०२ / २०२२ भादवि स कलम ३९५ दिनांक २३.१२.२०२२ रोजी ०३:१० वा फिर्यादी नाव आशिष जयकुमार चिंचवाडे वय-३८ स सिस नं ९० दत्तनगर कर्नाल रोड झेंडा चौक सांगली गोपनीय बातमीदार द्वारे माहीती प्राप्त झाली.

कारवाई करणारे अधिकारी आणि अमलदार मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली ,अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मैडम उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांचे मार्गदर्शनाखाली,
१) पोलीस निरीक्षक सतिश शिंदे
२) पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख
३) सपोनि प्रशांत निशानदार
४) सपोनि गजानन कांबळे
बिरोचा नरळे, संदीप गुरव, सागर लवटे, अनिल कोळेकर, संदीप पाटील, उदय माळी, सागर टिंगरे, चेतन महाजन, सुनिल जाधव, विक्रम खोत, संतोष गळवे, संदिप नलावडे, प्रकाश पाटील, कैप्टन गुंडवाडे, त्रिवेणी धोकटे, स्मिता सुर्यवंशी, सांगली शहर पोलीस ठाण्याकडील झाकीर हुसेन काझी, अरिफ मुजावर, रफिक मुलाणी, संदिप पाटील, मच्छिद्र बर्डे
अटक वेळ दिनांक
दिनांक ०७.०१ २०२३
आरोपीचे नाव पत्ता
१) अनिल ऊर्फ अन्या युवराज पिंपळे वय ४९ रा. अशोकनगर ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर
२) तुकाराम भिमराव घोरवडे वय-५४ रा. उंडे वस्ती मातापुर ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर
३) दाजी धनराज सोळंके वय ३६ रा. हरसुल गायरान नं १ लासुर ता गंगापुर जि. औरंगाबाद
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
दिनांक २३ १२२०२२ रोजी रात्री ०३.१० वाजता यातील फिर्यादी नामे आशिष जयकुमार चिंचवाड़े वय- ३८ रा. तिस नं ९० दत्तनगर, कर्नाळ रोड, झेंडा चौक, सांगली यांचे घरी मागील दरवाज्याचा कडी कोयंडा तोडुन हातात लोखंडी रॉड व कटर घेऊन घरात प्रवेश करून फिर्यादी आशिष चिंचवाडे यांचे हात बांधुन फिर्यादीच्या आईस ठार मारण्याची धमकी देऊन घरातील ३,६३,०००/- हजार रुपयांचा मुद्देमाल दरोडा टाकून लुटुन गेला असलेबाबत सांगली शहर पोलीस ठाणे येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगली शहर पोलीस ठाणे कडील दरोडा गुन्हयाचे ठिकाणी मा.पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम, उप विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अजित टिके यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस निरीक्षक अभिजीत | देशमुख यांना सदरचा दरोडयाचा गुन्हा उपठकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या.
सदर सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था. गु.अ. शाखा यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, सांगली शहर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी अभिजीत देशमुख यांचेकडील सपोनि गजानन कांबळे यांची पथके तयार करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे वरील सर्व पथकांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन गुन्हयाचा तपास चालू केला.
वरील गुन्हयाचा तपास करीत असताना सर्व तांत्रीक व इतर पध्दतीने गुन्हयाची माहिती घेऊन तपास करीत असतना गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकास गोपणीय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा अहमदनगर, औरंगाबाद व बाहेरच्या राज्यातील संशयीत आरोपीनी केला असलेबाबत माहिती मिळाली. मिळाले माहिती प्रमाणे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक श्रीरामपुर पोलीस ठाणे जि. अहमदनगर हद्दीत दाखल होऊन तेथील स्थानिक पोलीसांच्या मदतीने संशयीत इसम नामे
१) अनिल ऊर्फ अन्या युवराज पिंपळे वय- ४९ रा. अशोकनगर ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर
२) तुकाराम निमराव घोरवडे वय ५४ रा. उंडे वस्ती मातापुर ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर यांना अशोकनगर फाटा, श्रीरामपुर, अहमदनगर येथून ताब्यात घेतले. तसेच औरंगाबाद मधील तेथील स्थानिक पोलीसांचे मदतीने संशयीत इसम नामे
३) दाजी धनराज सोळंके वय ३६ रा. हरसुल गायरान नं में लासुर, ता गंगापुर जि. औरंगाबाद यास लासुर रेल्वे स्टेशन परीसरातुन ताब्यात घेतले होते.
वरील संशयीतांकडे दत्तनगर, कर्नाळ रोड येथे झाले दरोडयाच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता दाजी धनराज सोळंके याने सागितले की, ते तिघे व त्यांचे इतर सहा साथीदार हे महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वेने सांगली येथे येऊन त्या दिवशी दिवसभर वेगवेगळे ग्रुप करून ते सांगली शहरात फिरून त्यांनी संबधीत घरावर पाळत ठेवून रात्र आल्यानंतर घराजवळील परीसरात अंधारात लपुन बसुन मध्यरात्रीनंतर २ जणांनी मिळून गुन्हा केलेचे कबुल केले आहे. त्या सर्वांनी मिळून घराचे पाठीमागील दरवाज्याचे कुलुम तोडुन आत प्रवेश करत घरात असलेली महीला व पुरुषास धाक दाखवून त्यांचे अंगावरील व घरातील सोन्याचे दागिणे, रोख रक्कम वगैरे साहित्य चोरून नेले असलेबाबत कबुली दिली आहे.
वर नमुद ताब्यात घेतलेले संशयीत इसम यांना गुन्हयाचे तपास कामी सांगली शहर पोलीस ठाणेकडे रिपोर्टाने वर्ग केले होते आरोपीना मा न्यायालयाने पहिल्यांदा 15 दिवस व नंतर ५ दिवस अशी पोलीस कस्टडी मिळालेली आहे. पोलीस कस्टडी मध्ये असताना वरील आरोपींकडुन गुन्हयात चोरीस गेलेले ९९ ग्रॅम वजनाचे ५ लाख रू किंमतीचे सोन्याचे दागिणे, जमा करण्यात आले आहेस गुन्हयाचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे कडील सपोनि गजानन कांबळे हे करीत आहे.
वरील आरोपी क्र १ व २ यांनी छत्तीसगड राज्यातील सीटी कोतवाली येथील
१) गुरन १४ / २००८ भादविस कलम ३९५.
२) १८३/२०५६ भादवि कलम ३९५.४१२
३) २०/२०१६ भादवि कलम ४५७.३८०
४) मानकापुरा पोलीस वाणे नागपुर गुरन ५३ / २०१६ मादवि कलम ३९५ असे दरोडयाचे गुन्हे दाखल असुन यातील आरोपी यांनी अशा प्रकारचं गुन्हे मध्यप्रदेश, ओरीसा राजस्थान, छत्तीसगढ येथे केले आहेत अशी माहीती
(सतिश शिंदे) पोलीस निरीक्षक
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com