मोटार सायकल चोरी करणारा सराईत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, 1 लाख 3 हजार रुपये किमंतीच्या 4 दुचाकी जप्त…
उपसंपादक-रणजित मस्के
नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी गुन्हे बैठकीत मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता, नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच पोलीसांसमोर चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकिस आणणे हे मोठे आव्हान होते. त्याअनुषंगाने मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.

वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या मोटार सायकल चोरीच्या पध्दतीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, वेळ, दिवस किंवा चोरी होणारी विशेष कंपनीची मोटार सायकल यांची इत्यंभूत माहिती घेवुन रेकॉर्डवरील जेलमधुन सुटुन आलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर तसेच ज्या ठिकाणावरुन जास्त प्रमाणात मोटर सायकल चोरीस जातात त्याठिकाणी पाळत ठेवुन होते. तसेच आपले बातमीदारांमार्फत माहिती घेवुन मोटर सायकल चोरांचा शोध घेत होते.
दिनांक 06/01/2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा शहरातील जुनी भाजी मंडी परिसरात एक इसम कागदपत्र नसलेले मोटर सायकल कमी किंमतीत विकत आहेत अशी बातमी मिळाल्याने, सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांना सांगितली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे 01 पथक करुन त्यांना योग्य ते नियोजन करुन सापळा लावण्याचे आदेश देवून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ शहादा शहरातील जुनी भाजी मंडी परीसरात जावून खात्री केली असता एका टपरी जवळ एक इसम एका विना नंबर प्लेट असलेल्या मोटार सायकलसह दिसून संशयास्पद हालचाली करतांना दिसून आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्याकडे जात असतांना संशयीत इसमाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास पाठलाग करुन ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीताला त्याचे नांव गांव विचारले असता अनिल नरपत वसावे वय-22 रा. सरी पो. मोलगी ता. अक्कलकुवा जि.नंदुरबार असे सांगितले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com