पुण्यात श्रीसाई अर्बन निधी बॅंकेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन…

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

पुणे : पुण्यातील हडपसर येतील साई अर्बन निधी ली. बँकेने काल यशस्वी रित्या तिसऱ्या वर्षांत पदार्पण केले या निमित्ताने बँकेच्या तूपेनगर हडपसर येथील मुख्य शाखेत डॉक्टर्स वेलफेअर असोसीएशन (MSDA) आणि अनुसया क्लिनिक यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिराचा शंभर पेक्षा जास्त लोकांनी हजर राहून लाभ घेतला या प्रसंगी उपस्थित श्रीसाई अर्बन निधी ली. बँकेचे डायरेक्टर गजानन खैरकर सर यांनी आपल्या ठेवीदाराना गेल्या दोन वर्षांपासून दिल्या जाणाऱ्या ठेवी वरील परतावा आणि बँकेकडून मिळणाऱ्या सुखसुविधा या बाबत माहिती दिली आणि पुढे ही आपल्या प्रत्येक खातेधारकांना आजुन चागलं प्रकारे सेवा देण्याचे आश्वासन दिले.

या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित खातेधारकांनी ही गजानन सरांचं आभार मानले या आनंदाच्या क्षणी प्रमुख उपस्थिती अधिकारी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उस्मान शेख सर, अनुसया क्लिनिकचे सर्वेसर्वा डॉ अमोल पतंगे सर (MD), ज्ञानदेव मोरे सर, योगेश सासणे सर यांनी श्रीसाई अर्बन निधी बँक आणि गजानन खैरकर सर यांच्या कामाचे कौतुक केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट