रिक्षामध्ये विसरलेली दागिने आणि महत्वाच्या कागदपत्रांची महिला जेष्ठ नागरिकेची बॅग शोधण्यात रामनगर पोलिसांना मोठे यश…

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

डोंबिवली ( रामनगर ):पिंपळेश्वर मानपाडा ते डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक दरम्यान ऑटो रिक्षातून प्रवास करीत असताना डोंबिवली पूर्व मधील रहिवाशी उर्मिला गौरीशंकर गुप्ता या ६० वर्षीय जेष्ठ नागरिक महिला दागिने व महत्वाच्या कागदपत्रांची बॅग रिक्षातच विसरल्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी लगेच रामनगर पोलीस ठाणे येथे धाव घेतली व त्या बॅगेत २ तोळ्याचे मंगळसूत्र व महत्वाचे कागदपत्र असल्याचे सदर महिलेने सांगितले असता घटनेची तातडीने दखल घेत रिक्षाचा गाडी क्रमांक किंवा कोणतीही अधिकृत माहित नसून देखील CCTV व तांत्रिक मदतीच्या आधारे सदर रिक्षाचा शोध घेऊन त्या महिलेची हरविलेली बॅग वरिष्ठ पोलीस यांच्या उपस्थितीत परत करण्यात आली.

आपली दागिन्यांची बॅग मिळवून दिल्याबद्दल उर्मिला गौरीशंकर गुप्ता या जेष्ठ नागरिक महिलेने रामनगर पोलीस ठाण्याच्या संबंधित अधिकारी व पोलिसांचे आभार मानले.

सदर यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे (डोंबिवली विभाग) , रामनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली रामनगर पोलीस ठाणेचे पो. अंमलदार नितीन सांगळे व शिवाजी राठोड यांच्या पथकाने केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट