अंबानींच्या घराचा पत्ता विचारणाऱ्या कॅब चालकाचा मुंबई पोलीसांनी लावला शोध…

मुंबई – आझाद मैदान पोलीस ठाणे या हद्दीतील या अगोदर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली चारचाकी आढळ्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. त्या घटनेपासून सर्वच जण सतर्क झाले आहेत त्यातच काही दिवसांपूर्वी कॅबमधून आलेले 2 जण मुकेश अंबानींच्या निवासस्थानाचा पत्ता विचारत असल्याने चर्चांना उधाण आलं होतं.
निळ्या रंगाच्या कॅबमधून आलेल्या दोघाजणांनी आझाद मैदान परिसरात उभ्या असलेल्या एका टॅक्सी चालकाला मुकेश अंबानींच्या घराचा पत्ता विचारला. मॅपच्या आधाराने जा असं त्या टॅक्सीचालकाने सांगितलं पण अॅप खराब असल्याचं कॅबच्या चालकाने सांगितलं होतं. त्या दोघांचा वेशभूषा पाहुन आणि त्यांच्याकडील सामानाच्या सुटकेस बघून टॅक्सीचालकाला संशय आला.
म्हणून टॅक्सी चालकाने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. कॅबचा रंग आणि नंबर वरून पोलिसांनी कॅब चालक सुरेश पटेलला शोधून काढलं. तर कॅबमध्ये असलेले ते दोघे जण गुजरातमधून आलेले पर्यटक होते. ते फिरण्यासाठी मुंबईत आले होते. सर्व पर्यटनस्थळे पाहिल्यावर त्यांना मुंबईतील अंबानी यांच्या अँटिलिया पाहायची इच्छा असल्याची माहिती त्या कॅब चालकाने दिली.मला अँटिलियाचा पत्ता नीट माहिती नव्हता त्यात अॅप बंद असल्याने आम्ही पत्ता विचारला, असं कॅब चालक सुरेश पटेलने सांगितलं. तर कॅब चालकाने दिलेल्या माहितीनुसार आझाद मैदान पोलीस या प्रकरणाची अधीक चौकशी करत असून त्या दोन गुजराती पर्यटकांची माहिती मिळवण्याचे काम सध्या मोठया प्रमाणात सुरू आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com

अंबानींच्या घराचा पत्ता विचारणाऱ्या कॅब चालकाचा मुंबई पोलीसांनी लावला शोध…

मुंबई – आझाद मैदान पोलीस ठाणे