खूनाचा प्रयत्न करून फरार असलेल्या आरोपीस कासा पोलीस ठाण्याकडून अटक …
प्रतिनिधी-रणजित मस्के
पालघर: दि.२९/१२/२०२२ रोजी सकाळी ०६.०० ते ०६.१५ वाजताचे सुमारास मौजे कासा डोंगरीपाडा, ता. डहाणू जि. पालघर येथे फिर्यादी यांची मुलगी वय १८ वर्षे, ही भरतीचा सराव करण्यासाठी घराबाहेर गेली होती. यातील आरोपीत हा पाच महिन्यापासुन फिर्यादी यांचे मुलीस लग्नासाठी त्रास देत होता. आरोपीत यास लग्नास नकार दिल्याचे वादातुन कोणत्यातरी धारदार हत्याराने फिर्यादीची मुलगी हीचे डावे कानशिलावर, डोकीस, डावे हाताचे अंगठ्यावर, उजव्या हाताचे पंजावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन कासा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २४६ / २०२२ भा.द.वि.सं. कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी हा स्थानिक असून पोलीसांची चाहुल लागताच तो जंगलात पळून जात होता. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांचे आदेशान्वये श्री संजीव पिंपळे, उप विभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग अतिरीक्त चार्ज जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाणेचे सपोनि / श्रीकांत शिंदे यांचे अधिपत्याखाली तपास पथक तयार करण्यास सांगितले. सदर पथकास पालघर जिल्ह्यात चालू असलेल्या जनसंवाद अभियानाच्या प्रेरणेतून नागरीकांकडून आरोपी हा कासा डोंगरीपाडा परीसरात आल्याची बातमी मिळाली. त्या बातमीच्या आधारे कौशल्यपूर्ण सापळा रचून आरोपी वय २० वर्षे, रा. कासा, डोंगरीपाडा, ता. डहाणू जि. पालघर ताब्यात घेवून अटक करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढिल तपास हा सपोनि / श्रीकांत शिंदे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी हि श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांचे आदेशान्वये श्री संजीव पिंपळे, उप विभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग अतिरीक्त चार्ज जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि / श्रीकांत शिंदे, प्रभारी अधिकारी कासा पोलीस ठाणे, पोउपनि / संदिप पाटील, पोउपनि / संदिप नांगरे व कासा पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com