फेसबुकचे माध्यमातुन नागरीकांचा विश्वास संपादन करुन चोरी करणाऱ्या महिलेस मानपाडा पोलीस स्टेशनकडुन अटक…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

मानपाडा :

दिनांक २१/१२/२०२२ रोजी फिर्यादी श्री. महेश कृष्णा पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाणेत येवुन फिर्याद दिली की, त्यांची फेसबुकचे माध्यमातुन समृध्दी खडपकर या महिलेशी ओळख झाली. सदर महिलेने त्यांना फसबुकचे माध्यमातुन खोणीगांव येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यास बोलाविले. सदर हॉटेलमध्ये गप्पा करताना तिने त्यास बोलण्यात गुंतवुण ती त्याचेवर प्रेम करते असे दाखवुन त्याचा विश्वास संपादन करुन त्यास सदर हॉटेलमध्ये असलेल्या लॉजचे खोलीत घेवुन गेली. तेथे त्या दोघांनी जेवण केले. फिर्यादी हे बाथरुममध्ये गेल असता, सदर महिलेने फिर्यादी यांचे परवानाधारक रिव्हॉल्व्हर, सॅमसंग फोल्ड – ३ मोबाईल, सोन्याच्या तीन चेन, हातातील सोन्याचे कडे, एक टायटन कंपनीचे घडयाळ असा ४,७५,०००/- रु चा ऐवज घेवुन ती तेथुन पळुन गेली. सदर महिलेची कोणताही मोबाईल फोन नंबर अथवा तिचा कोणताही पत्ता फिर्यादी यांचेकडे नव्हता. फिर्यादी यांनी त्याबाबत मानपाडा पोलीस ठाणेत दिलेल्या तक्रारीवरुन मानपाडा पोलीस ठाणे गुरनं ९७९ / २०२२ भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

फिर्यादी यांची तक्रार गंभीर स्वरुपाची होती. सदर घटनेत फिर्यादी यांचे परवानाधारक रिव्हॉल्व्हर चोरीस गेले होते. सदर रिव्हॉल्व्हरचा आरोपी महिला ही गैरवापर करण्याची दाट शक्यता होती. घटनेचे गांभीर्य ओळखुन वपोनिरी. मानपाडा पो.स्टे. शेखर बागडे यांनी लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन फिर्यादी यांनी फेसबुकचे माध्यमातुन सदर महिलेस संपर्क केलेला असल्याने, त्यावरुन सदर महिलेचा शोध घेण्यास सुरवात करण्यात आली. तिचें फेसबुक अकाऊंट चेक करुन, तिचे नावाची खात्री करुन तिचेवर यापुर्वी अशा प्रकारचे काही गुन्हे दाखल आहेत काय याचा तपास केला असता, सदर महिलेचे नांवे डोंबिवली रेल्वे पोलीस ठाणेत भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन सदर महिला ही खार, गोवा राज्यात रहावयास मुंबई येथे राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर पत्यावर तिचा शोध घेतला असता, गेल्याचे समजले. त्याप्रमाणे गोवा येथे सदर महिलेचा शोध घेतला असता ती गोवा राज्यातील पेड म्हापसा, जि. बारदेज या ठिकाणी मिळुन आली. नमुद महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर महिलेकडे केलेल्या चौकशीत तिने फेसबुकचे माध्यमातुन अनेक लोकांशी संपर्क साधुन त्यांचा विश्वास संपादन करुन, त्यांना वेगवेगळया हॉटेलमध्ये बोलावुन, त्यांना दारुमध्ये गुंगीकारक पदार्थ टाकुन, सदर इसमांना गुंगी आल्यावर त्यांचेकडील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन अशा वस्तु चोरी करुन पळुन जात होती. बदनामीचे भितीने लोक तक्रार करीत नसल्याचे पाहुन तिचे मनोबल वाढुन तिने असे अनेक प्रकार अनेक नागरीकांशी केल्याची कबुली दिली. सदर चोरलेल्या वस्तु ती तिचा साथीदार विलेंडर विल्फड डिकोस्टा, वय ३४ वर्षे, रा. गोवा याचेकडे ठेवत असायची सदरच्या वस्तु तो बाजारात स्वस्तात विकत असायचा.

नमुद गुन्हयात आरोपीत नामे १) समृध्दी संतोष खडपकर, वय २९ वर्षे, रा. लता कुंज चाळ, रुम नं. ५, निर्मलनगर, खार पुर्व, मुंबई
२) विलेंडर विल्फड डिकोस्टा, वय ३४ वर्षे, रा. २०६/४, रुख्मिनी प्लाझा बिल्डींग जवळ, पेंड म्हापसा, जि. बारदेज, गोवा यांना अटक करण्यात आलेली असुन, त्यांचेकडुन फिर्यादी व साक्षीदार यांचे चोरी केलेले १६ मोबाईल फोन, ०१ रिव्हॉल्व्हर, दोन घडयाळे, २९० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकुण २०,८१,०००/–रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर महिलेवर यापुर्वी डोंबिवली रेल्वे पो.स्टे. गुरनं १७१/२०२२ भादविक ३७९ व नौपाडा पो.स्टे. गुरनं ३४५ / २०२२ भादविक ३२८,३७९ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, मा. श्री. सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३, कल्याण, मा. श्री. सुनिल कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाणेचे वपोनिरी. श्री. शेखर बागडे, सपोनिरी. अविनाश वनवे, पोहवा / सुशांत तांबे, पोहवा / सुनिल पवार, पोहवा / राजेंद्रकुमार खिलारे, पोहवा / दिपक गडगे, पोहवा / विकास माळी, पो शांताराम कसबे, पोना / यलप्पा पाटील, पोना / देवा पवार, पोना / प्रविण किनरे, पोशि/ बालाजी गरुड, मपोहवा / अरुणा चण, मपोना / प्राजक्ता खरनार यांचे पथकाने केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट