थर्टी फर्स्टला सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करून कायदा व्यवस्थेवर बाधा आणणाऱ्यांवर नंदुरबार पोलीसांना कारवाईचे आदेश…

प्रतिनिधी-रणजित मस्के

नंदुरबार: वर्षांच्या शेवटच्या दिवशी तसेच नवीन वर्षांच्या स्वागतासाठी काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करणाऱ्या तसेच कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या इस्मानविरुद्ध जिल्हा पोलीस दलाकडून कठोर कारवाईच्या करण्यासाठी सज्ज झाले आहेत. असा आदेश नंदुरबार जिल्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिले आहेत.
नंदुरबार जिल्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ठीक ठिकाणी नाका बंदी करून दुचाकी,चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे बस स्थानक रेल्वे स्टेशन व गर्दीचे ठिकाण व इतर महत्वाच्या ठिकाणी घातपात विरोधी तपासणी करण्यात येणार आहे .दारू पिऊन वाहन चालवितांना आढळून आलेल्या वाहन चालकांचे परवाने निलंबन करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठवून त्यांचेवर परवाने निलंबनाची कारवाई कारण्यात यईल तसेच बस स्थानक रेल्वे स्थानक बाजार पेठ इत्यादी गर्दीच्या ठिकाणी सोनसाखली चोरी , पाकीटमार अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून साध्या वेषातली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .
फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, ट्विटर व इतर सोशल मीडियांवर तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट प्रसारित करण्याविरुद्ध पोलीस दलातील सायबर सेल मार्फत सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे .बंदोबस्तासाठी जिल्हा पोलीस दलाकडून नव पोलीस निरीक्षक, 31 सहाय्यक पोलीस निरीक्षक ,पोलीस निरीक्षक ,456 पोलीस अधिकारी व अंमलदार असा एकूण बंदोबस्त 499 पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा बंदोबस्त संपूर्ण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील ,पोलीस अप्पर अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात आला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com