नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या अवैध विक्रेत्यांवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची धडक कारवाई…!!

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

नंदुरबार: नंदुरबार जिल्हा लगत असलेल्या गुजराज राज्यासह संपुर्ण भारतात मकरसंक्रांतीचा पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पतांगोत्सावाचा आनंद घेण्यासाठी लहानांपासुन थोरल्यांपर्यत सर्वच नागरिक घेत असतात. जिल्ह्यतील विविध शहरांमध्ये पतंग व मांजा विक्रेत्यांनी आप-आपली दुकाने मांडलेली असतात. पतंगोत्सव साजरा करतांना डी. जे. व स्पिकर लावुन मोठ-मोठ्याने गाणे लावुन नृत्य करतांना आपण बघत असतो, परंतु सण साजरा करुन आपली संस्कृती टिकवत असतांना पर्यावरणाची काळजी व सांभाळ करणे हे देखील सर्व सामान्य नागरीकांचे एक कर्तव्य आहे.

पतंगोत्सव साजरा करतांना नायलॉन मांजा वापरामुळे निसर्गातील बरेच पशु, पक्षी वेळप्रसंगी लोकांना दुखापत होवुन आपला जिव देखील गमवावा लागला आहे, असे अनेक उदाहरण आपण वर्तमानपत्र किंवा प्रसारमाध्यमांद्वारे बघत असतो. अशा प्रकारच्या पतंग उडविण्याच्या धाग्यामुळे प्राणघातक इजांपासुन पक्षी व मानव जिवितांस सरंक्षण करण्याची गरज आहे. अशा दुर्मिळ व नष्टप्राय होत असलेल्या निष्पाप पक्षांचे सरंक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.

दिनांक 28/12/2022 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरात जळका बाजार परिसरात डॉ. शर्मा यांच्या हॉस्पीटलच्या शेजारी असलेल्या बोळीत एक इसम बंदी असलेला नायलॉन मांजा / दोऱ्यांची विक्री करीत आहे अशी बातमी मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना कळवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथकाने सदर ठिकाणी जावून खात्री केली असता जळका बाजार परिसरात डॉ. शर्मा यांच्या हॉस्पीटलच्या शेजारी असलेल्या बोळीत एक इसम त्याच्या हातात पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी घेवून असलेला नायलॉन मांजाची विक्री करीत असतांना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून नाव गाव विचारले असता नितीन प्रकश छत्रिय वय-42 रा. चौधरी गल्ली, नंदुरबार असे सांगितले. त्याच्या ताब्यात 3120/- रुपये किमतीचे 06 नग MONO SKY NINJA नायलॉन मांजा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचेविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 797/2022 भा.द.वि. कलम 336 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पतंग उडवितांना केलेल्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे विजेच्या तारांवर घर्षण होऊन आग लागणे, उपकेंद्र बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जिवीत हानी होणे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. महेश माळी, पोलीस हवालदार सुनिल मोरे, पोलीस शिपाई श्रीकांत पाटील, शैलेंद्र माळी, राहुल पांढारकर, अफसर शहा यांच्या पथकाने केली आहे.

नागरिकांना आवाहन करण्यात येते की, प्लॅस्टीक किंवा तर कृत्रीम वस्तूपासुन बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडविण्याचा सणाच्या वेळी बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच नायलॉन मांजाची किरकोळ विक्री किंवा प्रमुख विक्रेत्याचा शोध घेवुन त्यांचेवर पर्यावरण (सरंक्षण) अधिनियम 1986 च्या कलमान्वये कारवाई करण्यात येईल. त्याचप्रकारे ज्या वस्तूंपासुन पर्यावरणास हानी पोहचेल असेल असे नायलॉन मांजाची विक्री, साठवणुक किंवा हाताळणी करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल तसेच नायलॉन मांजा विक्री व हाताळणी करतांना आढळुन आल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार 02564 210100 / 210113 यावर संपर्क साधावा असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी केलेले आहे. अशी माहिती म. जिल्हा माहीती अधिकारी, नंदुरबार यानी दिली आहे.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट