१८ वर्षाखालील वाहन चालकावर वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालघर पोलीसांची धडक कारवाई…
प्रतिनिधी-रणजित मस्के
पालघर: दिनांक २८/१२/२०२२ रोजी आंबेडकर चौक पालघर येथे एक १६ वर्षाचा युवक हा बेदरकारपणे १९.३० वा. वाहन चालवीत असताना दिसून आला. त्या युवकास तेथील वाहतूक नियमाचे कर्तव्य करत असलेल्या शासकीय गणवेशधारी पोलीस अंमलदार यांनी सदर वाहन चालकास थांबवण्याचा इशारा केला असता त्या इशाऱ्याचे अनुपालन न करता सदर युवक बेदरकारपणे त्याच्या ताब्यातील मोटार सायकल चालवित पळून गेला. सदर मोटार सायकलच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे गाडी मालकाची माहिती मिळवीण्यात आली व सदर युवक व मोटार वाहन ताब्यात घेतले.


सदर युवक हा १८ वर्षाखालील असल्याचे निष्पन्न झाले असता चौकशीत त्याच्याकडे वैध लायसन्स बाबत विचारणा करण्यात आली असता लायसन्स नसल्याबाबत त्याने निवेदन केले. म्हणून त्याचे ताब्यातील मोटार सायकल मोटार वाहन कायदा कलम २०७ अंतर्गत ताब्यात घेण्यात आली.

त्या अनुषंगाने चालक यांचेविरोधात महाराष्ट्र मोटर वाहन नियम १९८९ चे नियम २३९/१७७ मो.वा.का. (गणवेषधारी पोलीस अंमलदाराने हाताने इशारा केला असता आपले ताब्यातील वाहन थांबवले नाही), एमव्हीडीआर २०१७ नियम ९(१)/१७७ ए मोवाका (जंक्शनकडे पोहोचत असताना मोटार सायकलचा (वाहन) वेग कमी केला नाही. सबब कलम १८४ मोवाका (धोकादायकरित्या वाहन चालवणे), कलम ३ सह कलम ४ (१) / १८१ ( चालक विना वैध लायसन्स शिवाय), तर मोटार सायकल याचे मालकाविरुध्दात कलम ५ / १८० मोवाका ( अनधिकृत व्यक्तीस मोटार वाहन चालविण्यास परवानगी दिली) तसेच कलम १९९ ए मोवाका १९८८-२०-१९ (सुधारीत) अन्वये शिक्षेस पात्र अपराध चालक व मालक यांनी केला असे आढळून आले. चालकास रुपये ५०००/- दंड किंवा तीन महिन्यापर्यंत कैद किंवा दोन्ही शिक्षा तर मालकास ३०,०००/- रुपये दंड किंवा तीन वर्षापर्यंत कैद किंवा दोन्ही शिक्षा मा. न्यायालयामार्फत होऊ शकते.
श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांचे वतीने पालघर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अल्पवयीन मुलांना परवाना नसताना पालकांनी वाहन चालविण्यास देवू नये. अन्यथा अशा प्रकारच्या कारवाईस सामोरे जावे लागेल.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com