सातारा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची कौतुकास्पद अशी अति उल्लेखनीय कामगिरी …
प्रतिनिधी-रणजित मस्के
सातारा :गुरुवार दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी पोवाई नाका सातारा येथे वहातूक शाखेत कर्तव्यावर असताना एक अपंग व्यक्ती एका पायावर उड्या मारत रस्ता क्रॉस करत असताना दिसून आला.

त्यास थांबवून मदती करिता विचारपूस केली व त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव श्री. सागर बाबर रा. शेणोली स्टेशन, ता कराड असे सांगून त्याचा सन 2012 रोजी रेल्वे अपघात झाला व त्यामध्ये त्याचा एक पाय गमावला असल्याचे त्याने सांगितले.
तो कुबड्यांविना आजपर्यंत एका पायावर चालत असून त्याची घरची परिस्थिती खूप नाजूक असल्याने त्यास आजपर्यंत कुबड्या घेता येत नसल्याचे समजले,आणि तो कुबड्या घेण्यासाठी लोकांकडे मदत मागत असल्याने सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस विशाल मोरे, सुहास शिंदे, गौरी ढाणे, रेश्मा तांबोळी व पोलीस मित्र श्रीकांत पवार यांनी मदत म्हणून सागर बाबर याला कुबड्या घेऊन दिल्या त्यामुळे विभागातून या वहातूक पोलीसांवर कौतुकांचा वर्षांव होत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com