पुणे लोहमार्ग पोलीसांकडून मजूर दाम्पत्याच्या लहान बालकास पळवून नेणा-यांना जेरबंद करून बालकाची सुखरूप सुटका….

0
Spread the love

प्रतिनिधी-महेश वैद्य

पुणे : दि. ११/१२/२०२२ रोजी ०७.७४ वा.
पुणे रेल्वे स्टेशन सरकत्या जिन्याच्या बाजूला छत्री गेटजवळ.
१) विजय अनंतलाल जयस्वाल

२) सुमन शर्मा दोघेही रा. मध्य प्रदेश
लहान बालक, वय- २ वर्ष ११ महिने

मुळ गांव हकीकत:—फिर्यादी नामे पार्वती भुवन पाटले, वय २२ वर्षे, धंदा मजूरी, उमराव सिटी, भगारे वस्ती, ऊरळी कांचन, छत्तीसगढ या धर्मिक कार्यासाठी त्यांच्या नातेवाईंकासह पुणे दानापुर या रेल्वेने दि. १०/१२/२०२२ रोजी २०:०० वा. चे दरम्यान जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथे थांबल्या होत्या.

त्यावेळी त्यांना बोलण्यात गुंतवुन ठेवुन एक महिला व तिच्या साथीदार यांनी फिर्यादी यांच्या कायदेशीर रखवालीतील ०२ वर्षाच्या बालकास खाऊ देण्याच्या अमिषाने पळवून अपहरण केले होते.

सदरच्या गुन्हयाचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा, लोहमार्ग पुणे यांच्या मदतीने सहा. पोलीस निरीक्षक मिलींद झोडगे यांच्या नेतृत्वात एकूण ७ तपास पथके तयार करण्यात आली. त्याद्वारे सदर अपहरण झालेल्या बालकाचा व पळवून घेऊन जाणा-या अपहरणकर्त्याच्या सर्व प्रकारच्या हालचालींचा वेध घेण्यात येऊ लागला. त्यात पुणे रेल्वे स्टेशन परिसरांत येणा-या सर्व रस्त्यांवरील चौकांचे व संपूर्ण परिसराचे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरु करण्यात आली. त्याचप्रमाणे पुणे शहरातील ७८ लॉजेस, हॉटेल्स यांच्या ठिकाणी छापासत्र मारण्यात आले. या कारवाईत एकूण ११० छोटे मोठे विक्रेते यांचेकडील सीसीटीव्ही कॅमे-यांचे छायाचित्रण तपासण्यात आले. परंतु आरोपींतांच्या बाबत काहिएक सूगावा लागत नव्हता. आरोपीतांनी खुप सफाईदार पद्धतीने सदरचा गुन्हा केलेला होता.
छायाचित्रणाच्या त्यानंतर सीसीटीव्ही मधील अॅक्टीव्हीटीजद्वारे नमूद अपहरण झालेल्या बालकाच्या अपहरणकर्त्यांचा मागोवा घेण्यात आला. त्यात अशी माहिती मिळाली की, नमूद बालकांस एका महिलेने तिच्या एका साथीदारासह अपहरण केले आहे व त्यासाठी त्यांनी स्थानिक सार्वजनिक वाहन म्हणून रिक्षाचा वापर केला आहे. या झाले तपासातून पुणे शहरातील ४३ रिक्षाचालक व विविध रिक्षा संघटना यांच्याकडे तपासासाठी व मदतीसाठी आवाहान केले होते. परिणामी अपहरणकर्तेच्या तांत्रिक हालचाली व सोशल मिडियावरील हालचालींचा वेध घेऊन अपहरण झालेल्या बालकांस अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुखरुप सोडविण्यात आले आहे आणि अपहरण कर्त्याच्या मुसक्या आवळून गुन्हाचा- पर्दाफाश केला आहे.
हवा.

सदरची मौलिक कामगिरी ही डॉ. प्रज्ञा सरवदे, पोलीस महासंचालक सो, लोहमार्ग महाराष्ट्र राज्य, मुंबई, श्रीयुत श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे, श्रीयुत गणेश शिंदे अपर पोलीस अधिक्षक लोहमार्ग पुणे श्रीयुत चंद्रकांत वरिष्ठ भोसले पोलीस उप अधिक्षक (मुख्यालय) लोहमार्ग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लोहमार्ग पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग पुणे यांचेकडील वरिष्ठ पो. निरीक्षक ईरफान शेख, स.पो.नि. आंतरकर, वाचक शाखेकडील म.स.पो.नि. पालवी काळे, आर.पी.एफ. पुणेकडील निरीक्षक बी. एस. रघुवंशी, स.पो.नि. मिलिंद झोडगे, स.पो.फौ. हगवणे, पो. हवा. १०५१ सुनिल कदम, पो. हवा. ९४५ टेके, पो. हवा. १२६१ दांगट, पो. ११२२ कांबळे, पोहवा २९ चिले, पो.हवा. २०७ कुंभार पो. ना. ३०४ पवार, पो. कॉ. १११ गवळी, पो. कॉ. २०२ मधे, ११५ केंद्रे यांनी केलेले आहे. सदर कामगिरीस अतिरिक्त सहाय म्हणून स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग पुणे यांचेकडील व अंमलदार, तांत्रिक विश्लेषण विभागाकडील अंमलदार पो. हवा. १०१६ जगताप, ६९९ पवार, पो.ना. ७० गवारी तसेच आर. पी.एफ. पुणे कडील आरक्षक युवराज गायकवाड, विशाल माने, रांजणगाव एम. आय. डी. सी. पोलीस ठाणेकडल पो.शि. २८४१ शिंदे २८१७ कुतवळ यांनी मदत केली आहे. अशा प्रकारे एक ध्येयाने सदरची कामगिरी फत्ते करण्यास पुणे लोहमार्ग पोलीस दलास यश मिळालेले आहे.
अशा प्रकारे लोहमार्ग पुणे हे अपहरण झालेल्या अथवा वाट चुकलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी व भयमुक्त समाज निर्मितीसाठी सतत प्रयत्नशील आहे. तसेच नागरिकांना आवाहान करणेत येते की, त्यांनी लहान बालकांची योग्य ती काळजी घेऊन कोणत्याही भूल थापा व आमिषांस बळी न पडता आपल्या बालकांची योग्य ते सरंक्षण करावे असे आव्हान
वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.
(प्रमोद खोपकर)
पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे यानी केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट