पुण्यात पर्वती पोलीसानी नागरीकांचे एकून ६ लाख रूपयांचे हरवलेले २० मोबाईल नागरिकांना केले परत..

सह संपादक -रणजित मस्के
पुणे

पर्वती पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बागील सह महिन्यात नागरीकांचे बाजारपेठ तसेच इतरत्र नोबाईल हरवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सदर मोबाईलचा शोध घेण्याबाबत आम्हांला मा. वरीष्ठांचे आदेश प्राप्त झाले होते.
त्या अनुषंगाने वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे देखरेखी खाली एक पथक नेमले. सदर पथकात पोलीस अंमलदार धायगुडे व खेडकर अशी नेमणूक करण्यात आली. सदर पथकाने हरविलेल्या मोबाईल तसेच नंतर त्यामध्ये वापरत असलेल्या नंबरचे तात्रिक विश्लेषण करुन तसेच प्रत्यक्ष संपर्क साधून कर्नाटक, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात व महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्हयातून एकून ६,००,०००/-रू. किं. चे २० मोबाईल हस्तगत केले. सदर मोबाईल आज दि.२६/०७/२०२५ रोजी मा. पोलीस उप-आयुक्त परि.३. पुणे शहर यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले आहेत. याबाबत नागरिकांनी पर्वती तसेव पुणे शहर पोलीस दलाचे आभार व्यक्त केले.
सदरची कामगिरी ही गा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, ना.पोलीस उप-आयुक्त परि.३ पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग श्री. अजय परमार, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार खेडकरव व पायगुडे यांनी केली आहे.