स्थानिक गुन्हे शाखा पुणे यांनी ३ अवैध्य धंद्यांवर धडाकेबाज कारवाई करुन १२ किलो गांजासह ४ आरोपी केले जेरबंद

सह संपादक -रणजित मस्के
पुणे



1) दिनांक 25/7/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेवे स.पो.नि कुलदीप संकपाळ, पो.हवा तुषार पंदारे, पो. हवा जनार्दन शेळके, पो. हवा संजू जाधव, पो. अंम सागर धुमाळ असे पथक हे शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे अनुशंगाने पेट्रोलींग करीत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन इसम हे त्यांचे मोटारसायकलवरून अवैद्य मांजा विक्रीसाठी घेवून आमदाबाद फाटा येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीचाआशय हा मा. पो. निरीक्षक संदेश केंजळे सो शिरूर पोलीस स्टेशन यांना कळविले नंतर पो.नि केंजळे सो यांनी त्यांचेकडील पो.स.ई दिलीप पवार व स्टाफसह मळगंगा लॉन्स जवळ सापळा लावला असता संशयित दोन इसम मोटारसायकवर येताना दिसले त्यांना जागीच थांबवून त्यांचेकडे असलेल्या सँक ची पाहणी केली असता त्यात उम्र वासाचा 4 किलो 185 ब्रम गांजा मिळून आला ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही इसमांना त्यांचे नाव व पत्ता विचास्ता त्यांनी त्यांचे नावे १) शुभम शंकर मोठीते वय 29 रा. टाकलीहाजी ता. शिरूर जि. पुणे २) विजय कैमराज काळे क्य 29 स. टाकळीहाजी ता. शिरूर जि. पुणे असे असल्याचे सांगितले त्यांचेकडे एकूण 80,000/- रू किमतीचा गांजा नावाचा अमली पदर्थ व मोटाररायाकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी वर शिरूर पोलीस स्टेशन मु.र.नं 542/2025 एन.डी.पी. एस कायदा कलम 1985 वे कलम 8 (सी), 20 (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वरील दोन्ही आरोपी यांना पुढील तपास कामी शिरूर पोलीस स्टेशनचे तव्यात देण्यात आले आहे.
2) दिनांक 25/7/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेवे स.पो.नि कुलदीप संकपाळ, पो. हवा तुषार पंदारे, पो.हवा जनार्दन शेळके, पो.हवा संजू जाधव, पो. अंम सागर धुमाळ असे पथक हे शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे अनुशंगाने पेट्रोलींग करीत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे शिरूर गावचे हद्दीत बुरूड आळी येथे गुलमोहर अपार्टमेन्ट मध्ये इसम नामे रफिक शेख हा त्याचे राहते घरात प्रतिबंधित गुटखा तंबाकु. पानमसाला विक्री करीता साठवून ठेवला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी स्टाफ व पंचासह जावून छापा टाकला असता गुलमोहर अपार्टमेन्ट मधील पहील्या मजल्यावरील इसम नामे रफिक चौट शेख याचे घरामध्ये एकूण 3,56,781/- रू चा वेगवेगळ्या कंपनीचा गुटका तंबाकु व पानमसाला असा मानवी आरोग्याला घातक हानिकारक पठर्थ जवळ बाळगला असता मिळून आलेने तो जप्त करून त्यावेवर शिरूर पोलीस स्टेशन मु.र.नं 543/2025 बी.एन.एस कलम 123,274,275,,223 सह अन्ज व सुरक्षा मानके अधिनियम 2006 चे कलम 26 (2) 1), 26(2) (ii), 26 (2) (lv) वगैरे अन्वये गुन्हा दाखल करम्यात आला असून आरोपी नामे रफीक चांद शेख वय 36 रा. गुलमोहर अपार्टमेन्ट बुरूडआळी शिरूर ता. शिरूर जि.पुणे यास पुढील तपास कामी शिरूर पोलीस स्टेशनचे तब्यात देण्यात आले आहे.
3)26/7/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि कुलदीप संकपाळ, पो. हवा तुषार पंदारे, पो. हवा जनार्दन शेळके, पो.हवा संजू जाधव, पो. अंम सागर धुमाल असे पथक हे शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रकटीकरण व अवैध व्यवसायावर कारवाईच्या अनुशंगाने पेट्रोलींग करीत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे शिरूर गावचे हद्दीत मंगलमुर्ती नगर येथे इसम नामे रमेश उर्फ रमन रामभाऊ खराडे हा आपले कब्जात बेकायदेशीर पणे गांजा विक्रीकरीता जवळ बाळगला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीचा आशय हा मा. पो. निरीक्षक संदेश केंजळे शिरूर पोलीस स्टेसन यांना कळवून पो. नि केंजळे सो यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांची परवानगी घेवून सदर ठिकाणी स्थानिक मुन्हेशाखेचा स्टाफ व शिरूर पोलीस स्टेशनवा स्टाफ व पंच, फोटोग्राफर यांचेसह जावून छापा टाकला असता
मंगलमुर्तीनगर येथे इसम नामे रमेश उर्फ रमन रामभाऊ खराडे हा मिळून आला त्याचे मंगलमुर्तीनगर येथील घरात 1,20,000/- रू किमतीचा 8 किलो वजनाचा गांजा नावाचा अमली पदार्थ विक्रीकरता जवळ बाळमले असता मिळून आला सदस्वा माल पंचासमक्ष जप्त करून आरोपी नामे स्मेश उर्फ रमन रामभाऊ खराडे वय 33 रा. कामाठीपुरा शिरूर ता. शिरूर जि. पुणे यास पुढील तपास कामी शिरूर पोलीस स्टेशनवे तब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक श्री संदीपसिंह गिल सो अप्पर पोलीस अधिक्षक श्री रमेश चोपडे सो उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत ढोले सो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे स.पो.नि कुलदीप संकपाळ, स.पो.नि. दिपक कारंडे, पो. स.ई दिलीप पवार, पो. स.ई सागर शेळके, पो.हवा तुषार पंदारे, पो. हवा जनार्दन शेळके, पो हवा संजू जाधव, पो. हवा राजू मोमीन, पो. हवा नाथसाहेब जगताप, पो. हवा नितीन सुद्रीक मपो. हवा भाग्यश्री जाधव, पो. अंमलदार सागर धुमाळ, पो. अम सचिन भोई यांनी केली आहे.