खरपुडी रोड परिसरात गावठी पिस्टल बाळगणारा आरोपी अशोक भोसले स्था. गुन्हे शाखा जालना यांच्या जाळ्यात

सह संपादक -रणजित मस्के
जालना



जालना जिल्हयात अवैध गावठी पिस्टल बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत मा.पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव व पथकास सुचना दिल्या होत्या.
त्यावरुन श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे एक पथक तयार करुन कारवाई करण्या बाबत मार्गदर्शन केले होते.
दिनांक 13/07/2025 रोजी गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेत असतांना इसम नामे अशोक भानुदास भोसले, रा. गोकुळवाडी, ता.जि. जालना हा खरपुडी रोडवर गावठी पिस्टल बाळगुन असल्याची माहिती मिळाल्याने त्यास चाळगे मेगासिटी प्रवेशद्वार, खरपुडी रोड, जालना परिसरातून ताब्यात घेवुन त्याकडुन रु.41.200/- किंमतीचे एक गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतुस जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुध्द तालुका पोलीस ठाणे, जालना येथे सरकारतर्फ राजेंद्र छगनराव वाघ, पोलीस उप निरीक्षक स्था.गु.शा. जालना यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ व सोबत स्थागुशाचे अमंलदार प्रभाकर वाघ, रमेश राठोड, लक्ष्मीकांत आडेप, इरशाद पटेल, सतिष श्रीवास, किशोर पुंगळे, अशोक जाधवर यांनी केली आहे.