चांदुर रेल्वे पोलीसांची जुगार अड्डयावर धडक कार्यवाही

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

अमरावती :

दि.१४/०७/२०२५ रोजी गुप्त बातमिदाराकडुन माहिती मिळाली की पळसखेड येथे स्मशानभुमीचे बाजुला खुल्या जागेत टेकडयावर काही ईसम एक्का बादशाहा नावाच्या हारजीतचा जुगार खेळ खेळत आहे. अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे खाजगी वाहनाने ग्राम पळसखेड येथील स्मशान भुमी जवळ लपत छपत गेलो असता ग्राम पळसखेड येथे स्मशान भुमी जवळ गेलो असता बाजुला काही ईसम गोल आकारात बसले दिसले सदर ईसम हे एक्का बादशाहा नावाचा हारजीतचा खेळ खेळत असल्याची पंचाची व आमची खात्री पटल्याने लागलीच त्यांचेवर जुगार रेड केली असता जुगार खेळणारे ईसम जागीच मिळुन आले त्यांचे ताब्यातुन जुगाराचे नगदी ७३००/-रू दोन अॅडरॉईड मोबाईल कि.१४०००रू तसेच जुगाराचे घटनास्थळावरून तीन मोटर सायकल क १) मौसा एम.एब २७ डिजी -४७०२ कि. ७०,०००रू, २) एम.एच- २७ डि.सि-७०६७ कि.६५,०००, ३) डिसकव्हर बिना नंबरची कि.५००००रू असा एकुण २,०६,३००/- रू चा चा मुददेमाल दोन पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेण्यात आला. आरोपी नामे १) निखील रामकृष्ण राउत वय ३२ वर्ष रा. सावंगी संगम २) आशिष श्रीराम सहारे वय ३२ वर्ष रा. पळसखेड ३) जानराव विठठलराव लाडे वय ५५ वर्ष रा. बांदुर रेल्वे ४) संदिप मुकुंदराव पुंड वय ३५ वर्ष रा. पळसखेड हे जागेवर घटनास्थळी मिळुन आले. त्याच प्रमाणे देवा भिमरावजी मानकर रा. धानोरा म्हाली २) अनिकेत सुधाकर बावणे रा. पळसखेड ३) शेख जावेद शेख शेरू रा. पळसखेड हे घटनास्थळावरून फरार झाले. वर नमुद आरोपीतांबर कलम १२ अ महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक विशाल आनंद सा. मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल पवार साहेब चांदुर रेल्वे यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक अजय आकरे, परी पोउपनि रोहीत कुदळे, पोलीस अंमलदार राहुल इंगळे, शिवाजी घुगे, निलेश रिठे, नितिन शेंडे, संदिप वासनिक, गुजान वाघमारे, प्रविण मेश्राम, संदिप बटुकले, ऋकेश, स्वप्नील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट