चैन स्नैचिंग करणाऱ्या आरोपीच्या डोंबिवली पोलीसांनीआवळल्या मुसक्या..

प्रतिनिधी : विश्वनाथ शेनोय
दि १४ डोंबिवली ठाणे

कल्याण-डोंबिवली परिसरात मॉर्निंग वॉक करणारे पुरुष व महिला यांना लक्ष्य करून, त्यांचे गळयातील सोन्याचे दागिने जबरीने खेचुन मोटारसायकल वरून आरोपी पळून जात होते.
चैन स्नॅचिंगचे आरोपींनी डोंबिवली विभागामध्ये धुमाकुळ घातला होता. सदरचे गुन्हे वाढत चालले होते. चैन स्नॅचिंगला आळा घालण्यासाठी व झालेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मा. पोलीस आयुक्त साो, ठाणे शहर यांनी मार्गदर्शन करून, हद्दीतील मॉर्निंग वॉकच्या वेळी अॅन्टी चैन स्नॅचिंग पेट्रोलींग व नाकाबंदीचे आयोजन करून गुन्हेगार चेकींग करण्यासाठी मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे उपाययोजना करण्यात आली. परंतु आरोपी हे पोलीसांना गुंगारा देवुन, चैन स्नॅचिंग करत असल्याचे निदर्शनाश आले. नमुद आरोपी हे गुन्हा करताना प्रत्येक वेळी मोटारसायकल बदलत असल्याने, त्यांचा शोध घेणे पोलीसांसमोर एक आव्हान होते.
दिनांक २३/०६/२०२५ रोजी सकाळी ०७:३० वा. चे सुमारास ९० फुट रोड, दावत हॉटेलसमोर मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका महिलेच्या गळयातील सोन्याची चैन जबरीने खेचुन चोरी केली होती.
तसेच दिनांक ०९/०७/२०२५ रोजी सकाळी ०८:०० ते ०८:४५ वा. चे दरम्यान महिला नामे-सौ. मंजु अनिल शहा, वय. ६३ वर्षे, काम-गृहिणी, रा. विश्व जिवन प्रकाश टॉवर, ५०५, एम.आय.डी.सी. रोड, गावदेवी मंदीराजवळ, चोळेगाव, ठाकुर्ली, डोंबिवली पुर्व, या ९० फुट रोड, डोंबिवली पुर्व येथे मॉर्निक वॉक करत असताना, दोन अनोळखी इसमांनी मोटारसायकवर येवुन, त्यांचे गळयातील १,८०,०००/- रू. किंमतीची २० ग्रॅम सोन्याची चैन जबरीने खेचुन भरधाव वेगाने मोटारसायकलवरून पळुन गेले होते. सदरबाबत डोंबिवली पोलीस ठाणे, गु.रजि. नं.५५१/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (६), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. मा. पोलीस आयुक्त साो, यांचे मार्गदर्शनाखाली चैन स्नॅचिंगचे आरोपींबाबत तांत्रीक, नैसर्गिक, भौगोलीक व गुन्हयाचे पध्दतीचा अभ्यास करून, आरोर्षीची माहिती काढुन आरोपी येणारे व जाणारे मार्गावरील तब्बल १७२ CCTV कॅमेरांचे फुटेज तपासुन, तांत्रीक तपासाचे आधारे आरोपी नामे परेश किशोर घावरी, वय.३५ वर्षे, काम-हॉटेल मॅनेजर, रा.०५, खोली चाळ, कामगार वसाहत, शंकर राव चौक, गुजराती शाळेमागे, कल्याण पश्चिम यास ताब्यात घेवुन, त्याचेकडे सखोल चौकशी करता त्याने खालीलप्रमाणे गुन्हे केले असल्याचे कबुल केले आहे.
१ डोंबिवली पोलीस ठाणे, गु.रजि.नं.५५१/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (६), ३(५) प्रमाणे
२ डोंबिवली पोलीस ठाणे गु.रजि नं.५०४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०४ (२), ३(५) प्रमाणे
३ मध्यवर्ती पोलीस ठाणे गु.रजि नं.५४८/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०४(२),३(५) प्रमाणे
आरोपीने वरीलप्रमाणे एकुण ०३ गुन्हे केल्याचे कबुल केले असुन, डोंबिवली पोलीस ठाणे दाखल गुन्हयांतील १) १,८०,०००/- रू. किमतीची २० ग्रॅम सोन्याची चैन, २) ९०,०००/- रू. किंमतीची १० ग्रॅम सोन्याची चैन, तसेच वरील तिन्ही गुन्हयांत वापरलेल्या १) १,१५,०००/- रू. किं.ची पल्सर मोटार सायकल क. MH-05/FS-9656 व २) १,७०,०००/- रू. किं.ची यामाहा कं.ची स्कुटर क. MH-05/FY-1470 असा एकुण ५,५५,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल आरोपीकडुन जप्त करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास डोंबिवली पोलीस ठाणे तपास पथक करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त साो, ठाणे शहर, मा. सह पोलीस आयक्त साो, मा. अपर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, मा. पोलीस उप आयुक्त साो, परि.०३ कल्याण, मा. सहा पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मा.श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली पोलीस ठाणे, सपोनि/बळवंत भराडे, पोउनि/प्रसाद चव्हाण, पोउनि/गोरखनाथ गाडेकर, पोहवा /१९२४ सुनिल भणगे, पोहवा/७२१९ मंगेश शिर्के, पोहवा /१३०७ प्रशांत सरनाईक, पोशि/३४०६ शिवाजी राठोड, पोशि/८४१३ नितीन सांगळे, पोशि/३९९८ निलेश पाटील, पोशि/७६०६ देविदास पोटे, पोशि/६१०२ राजेंद्र सोनवणे, पोशि/२०२६ ज्ञानेश्वर शिंदे यांनी केलेली आहे.