नालासोपाऱ्यात पोलीसांना अमानुष मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र पोलीस बाइज संघटनेतर्फे निवेदन..

उपसंपादक -मंगेश उईके
नालासोपारा




महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्ह्याच्या वतीने नालासोपारा पूर्व नागिनदास या ठिकाणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याबाबत अर्ज दाखल करण्यात आला.
दि. १५/०७/२०२५ रोजी नालासोपारा पूर्व नागिनदास या परिसरात पोलीस हवालदार हनुमंत सांगळे,पोलीस कॉन्स्टेबल शेषनारायण आठरे, हे ऑन ड्युटी आपले कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांच्या कामात अडथळा आणून त्यांना मारहाण करण्यात आले, मारहाण करणाऱ्यांची नावे, -: मंगेश नारकर, पार्थ नारकर दोन इसमांनी, आपले पोलीस कर्मचारी यांना अमानुषपणे मारहाण केले आहे , अशा आरोपींना व समाजकंटकांना कायद्याने शिक्षा देण्यासाठी एखादा कठोर शासन निर्णय घ्यावा जेणेकरून पुन्हा असे पोलिसांवर हल्ले होऊ नये व वर्दीचा अपमान देखील होऊ नये.या सदर घटना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आणि पोलीस कुटुंबांसाठी खूप धक्कादायक आहे. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ही मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. आणि आरोपींवर त्वरित गुन्हा दाखल करावे कठोर कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा टीम यांनी विजय जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच चंदू तडवी पोलीस उपनिरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे नालासोपारा पूर्व.पोलीस ठाणे यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा वरिष्ठ कार्यकारणी अध्यक्ष मनीष जयस्वाल व पालघर जिल्हा अध्यक्ष युवक आघाडी दिनेश गोसावी, पालघर जिल्हा महिला अध्यक्ष अर्चनाताई नलावडे, पालघर जिल्हा सचिव रोहित सावंत, मुंबई कोषाध्यक्ष विद्यार्थी आघाडी घनश्याम मोरडीया, सहाय्यक अध्यक्ष पालघर जिल्हा नितीन अल्लाड, यांनी तक्रार अर्ज दाखल कला आहे.