धारावी पोलीसांनी १५.७७० किलोग्रॅम गांजा (किं. अं. ३,१५,४०० रू.) ” जप्त करून आरोपीस घातल्या बेड्या….
प्रतिनिधी- महेश वैद्य
धारावी: मिळालेल्या माहितीनुसार, गु.र.क्र.१३७५/२०२२ कलम ८ (क), २० एन. डी. पी. एस. अधिनियम, १९८५ दिनांक २०/१२/२०२२ रोजी २१.५० च्या पुर्वी
दिनांक २०/१२/२०२२ रोजी
आकाश टावर जवळ, धारावी मेन रोड परिसर, धारावी, मुंबई ४०००१७ येथे ,

गुन्ह्याची थोडक्यात हकिकत :- धारावी पोलीस ठाणेस गोपनीय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे चे पोनि. भारत सलगर, पोउपनि साळुंखे, पोउपनि कामशेट्टे व पोलीस पथक यांनी आकाश टावर जवळ, धारावी मेन रोड परिसर, धारावी, मुंबई ४०००१७ या ठिकाणी सापळा रचला असता एक इसम संशयीतरीत्या दोन गोण्यांसह मिळून आल्याने धारावी पोलीस पथकाने त्या इसमास शिताफीने ताब्यात घेतले व त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून एकूण १५.७७० किलो ग्रॅम वजनाचा “गांजा” हा अंमली पदार्थ (अं. कि. ३,१५,४०० /- रु. ) जप्त करण्यात आला आहे.
सदर बाबत सविस्तर पंचनामा करून नमुद इसमास त्याच्याकडे मिळालेल्या अंमली पदार्थासह तब्यात घेऊन पोह. शिर्के यांनी सरकार तर्फे दिलेल्या तक्रारीवरून नमुद इसमावर धारावी पोलीस ठाणे गु.र.क्र. १३७५ / २०२२ कलम ८ (क), २० एन.डी.पी.एस. अधिनियम, १९८५ अन्वये गुन्हा नोंद करून नमुद इसमास उपरोक्त गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी एक इसम – वय २४ वर्षे आहे.
नमुद अटक आरोपीताकडे जप्त करण्यात आलेला “गांजा” हा अंमली पदार्थ कोणाकडून घेतला याबाबत पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि खंडागळे हे करत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मा. सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, मा. अप्पर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे- मध्य प्रादेशिक विभाग, मा. पोलीस उप आयुक्त मनोज पाटील – परि. ०५, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गोविंद गंभिरे – कुर्ला विभाग, मा. वपोनि विजय कांदळगावकर-धारावी पोलीस ठाणे, पोनि भारत सलगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विजय खंडागळे, पोउनि रामेश्वर कामशेट्टे, पोउनि मयुरेश साळुंखे, गुन्हे प्रकटीकरण पथक, दहशतवाद विरोधी पथक, गुंडाविरोधी पथक यांनी केली आहे.
अशाप्रकारे बृहन्मुंबई पोलीस हे अंमली पदार्थ मुक्त समाज निर्मीतीसाठी सतत प्रयत्नशील आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com