परतवाडा पोलीसानी मोबाईल दुकान फोडीचा गुन्हा केला उघड करुन आरोपी मयुर सोंदियास केले जेरबंद..

सह संपादक -रणजित मस्के
अमरावती :

मा. पोलीस अधिक्षक साहेब अमरावती ग्रामिण यांनी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मालमततेच्या गुन्हयांना आळा बसावा करिता विशेष सुचना दिल्या आहे. फिर्यादी हेमराज जयरामदास दौलतानी, वय ३९ वर्ष, रा. गुयनानक नगर परतवाडा यांनी दिनांक १३/०७/२०२५ रोजी जबानी रिपोर्ट दिला की, दिनांक ०६/०७/२०२५ चे ११/०० वा. ते दिनांक १३/०७/२०२५ चे ११/०० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोराने त्यांचे ओमसाई मोबाईल शॉपीचे दुकानचे शटरचे कुलुप तोडुन तसेच शटर वाकवुन दुकानामध्ये प्रवेश करून एकुण ०८ अॅड्रॉईड मोबाईल किंमत अंदाजे ६८,००० रू वेचे मोबाईल चोरी केलेले आहे. अश्या फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक ४८७/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१(३),३३१ (४) भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्हयातील आरोपी व मुद्देमाल शोधकामी पोलीस स्टेशन परतवाडा डि बी पथक रवाना होवुन माहीती घेत असता गुप्त बातमीदारा कडुन विश्वसनीस माहीती मिळाली की, पोलीस स्टेशन रेकॉडवरील गुन्हेगार मयुर नारायण सोंदिया, वय २१ वर्ष रा. कैकाडीपुरा परतवाडा ता. अचलपुर नि. अमरावती हा एक ओपो कंपनीचा अॅड्रॉईड मोबाईल विक्री करण्याचे उददेशाने जयस्तंभ चौक येथे फिरत आहे. अशा माहीतीवरून डि बी स्कॉड जयस्तंभ चौक येथे जावुन आरोपी नामे मयुर नारायण सोंदिया, वय २१ वर्ष रा. कैकाडीपुरा परतवाडा ता. अचलपुर जि. अमरावती यास ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन मोबाईल संबंधाने विचारपुस केली असता त्याने सदर मोबाईल हे रेस्ट हाऊस चौक येथिल मोबाईल शॉपी मध्ये चोरी केला असल्याचे सांगितल्याने व सदर घटनेसंदर्भाने पोलीस स्टेशन परतवाडा येथे अप क्रमांक ४८७/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद आहे. नमुद आरोपीस विश्वासात घेवुन आणखी विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हयात चोरी गेलेले आणखी ०७ मोबाईल असे एकुण खालील वर्णनाचे ०८ अॅड्रॉईड मोबाईल काढुन दिले आहे.
०१) रियलमी 6 कंपनीचा मोबाईल IMEI NO 869940041056935 क्रमांकाचा जुना वापरता कि.अं. १०,००० रू. ०२) रेडमी NOTE 11 कंपनीचा मोबाईल IMEI NO 861620053217132 क्रमांकाचा जुना वापरता कि.अं. १०,००० रू. ०३) ONE PLUS NOTE C 2 कंपनीचा जुना वापरता मोबाईल कि.अं. १२,००० रू.
०४) शॉवमी 11। कंपनीचा मोबाईल IMEI NO 867179052071150 कमांकाचा जुना वापरता कि.अं. ११,००० रू.
०५) रियलमी नारजो NSS कंपनीचा मोबाईल IMEI NO 8666018067974050 क्रमांकाचा जुना वापरता कि. अं. ६००० रू ०६) ओपो A3X कंपनीचा मोबाईल IMEI NO 869238070355439 क्रमांकाचा जुना वापरता कि.अं. ८,००० रु
०७) विवो 19 कंपनीचा मोबाईल IMEI NO 861499072767975 क्रमांकाचा जुना वापरता कि.अं. ७००० रू
०८) ओपो F15 कंपनीचा मोबाईल IMEI NO 8631150 41981723 कमांकाचा जुना वापरता कि.अं. ५००० रू असा एकुण ०८ अॅन्डरॉईड मोबाईल एकुण किमंत ६८,००० रू मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक विशाल आनंद, मा. अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, मा. सहायक पोलीस अधिक्षक उपविभाग अचलपुर डॉ. शुभम कुमार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के ठाणेदार परतवाडा, स.पो.नि. संजय अत्राम, पो.हे.कॉ. सचिन होले, सुधिर राउत, पो. कॉ. विवेक ठाकरे, घनश्याम किरोले, शुभम शर्मा जितेश बाबील, योगेश बोदुले, पो. कॉ. सचिन कोकणे यांनी केली.