जुगार खेळणारे इमसावर चांदुर रेल्वे पोलीसांनी केली धडक कारवाई…

सह संपादक -रणजित मस्के
अमरावती

दि. १७/०७/२०२५ रोजी गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, धामनगाव रेल्वे रोड चर्चच्या मागे चांदुर रेल्वे येथे खुल्या जागेवर काही इसन एक्का बादशाह नावाचा हारजित जुगार खेळ खेळत आहे अशा मिळालेल्या माहीतीच्या आधारे मिळालेल्या माहीतीच्या आधारे खाजगी वाहनाने चर्चच्या मागे चांदुर रेल्वे धामनगाव रोड येथे लपत छपत गेलो असता काही इसम गोलाकार बसुन दिसले. सदर इसम हे एक्का बादशाह नावाचा हारजिया जुगार खेळ खेळत असल्याची पंचाची व आमची खात्री पटल्याने लागलीचे त्याचेवर जुगार रेड केला असता जुगार खेळणारे इसम जागीच मिळुन आले त्याचे ताब्यातुन जुगाराचे नगदी २९७० रू, तिन अॅण्डाईड मोबाईल कि ३००००/रू १) बजाज पल्सर कंपनीची मोसा क एमएच ३१ सि वाय ९०२८ कि ७५००० रू ३) हिरो होन्डा स्पेल्डर मोसा क एमएच २७ एयु २४६४ कि.अ. ४५,००० रू. असा एकुण १,५२९७० / रू. मुददेमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेण्यात आला. आरोपी नामे १) मनिष रतनलाल उपाध्यायं वय ४० वर्ष रा. वकील लाईन चांदुर रेल्वे २) संतोष शिवनाथ केशरवानी वय ३६ वर्ष रा. आठवडी बाजार चांदुर रेल्वे ३) प्रफुल्ल राजु वासनिक वय ३६ वर्ष रा.शिक्षक कॉलनी चांदुर रेल्वे यांचेवर कलम कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक सा.श्री. विशाल आनंद, मा. अपर पोलीस अधिक्षक सा. श्री पंकज कुमावत सा. उपविभागीस पोलीस अधिकारी सा. श्री अनिल पवार, यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक अजय आकरे, श्रेपोउपनि नंदलाल लिंगोट, पोलीस अंमलदार शिवाजी घुगे, प्रविण मेश्राम, राहुल इंगळे, प्रशांत ढोके, संदीप वासनिक यांनी केली.