सोन्याच्या गित्र्या असल्याचे भासवुन फसवणुक करणारे फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणकडून जेरबंद

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

अमरावती

आरोपीचे नांव :-

१) कैलास भाउराव जाधव वय ३८ वर्ष, रा. सावंगी ता. दारव्हा जि. यवतमाळ

२) लक्ष्मण देवीदास जाधव वय ६२ वर्ष, रा. सोमठाणा इ.मु. कारंजा जि. वाशिम

दिनांक १७/०६/२०२५ रोजी फि, पदमीनी भरणे वय ४५ वर्ष, रा. सारखनी ता. किनवट जि. नांदेड यांना आरोपी दिपक पल्लार्ड रा. गोंडवडसा ता. किनवट जि. नांदेड याने याचे साथीदारासह कमी पैशाच्या मोबदल्यात सोन्याच्या गिझ्या देण्याचे आमिष दाखवून नकली सोन्याच्या गिल्या दाखवून मारहाण करुन फिर्यादी कडून ३,००,०००/-रु जबरीने घेवून चारचाकी वाहनाने पळून गेले. वरुन पो.स्टे. नांदगाव खंडेश्वर येथे अप.क्र. १९०/२०२५ कलम ३१० (२) बि.एन.एस. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पो.उप.नि. मुलचंद भांबुरकर याचे पथकाने दिनांक १९/०६/२०२५ रोजी सदर गुन्हयातील १) दिपक उर्फ अश्धिन पल्हाडे २) शामराव आनंदराव राखडे ३) सचिन विलास तोडसाम तिन्ही रा. गॉडवडसा ता. माहूर जि. नांदेड याना पकडुन पो.स्टे. नांदगाव खंडेश्वर यांचे ताब्यात दिले होते. तपासात त्याचे कडून मुख्य आरोपी लक्ष्मण जाधव रा. कारंजा जि. वाशिम हा व याचे साथीदार असल्याचे निष्पन्न झाले होते. सदर गुन्हा दाखल झाल्यापासुन गुन्हयातील आरोपी फरार होते.

फरार आरोपी नामे लक्ष्मण जाधव रा. कारंजा जि. वाशिम याचा शोध घेत असतांना दिनांक १७/०७/२०२५ रोजी गोपनिय बातमीदाराकडून खबर मिळाली की, लक्ष्मण जाधव हा त्याचे राहते घरी हजर आहे. अशा माहितीवरुन पो.उप.नि. मुलचंद भांबुरकर व त्यांचे पथकाने लक्ष्मण देवीदास जाधव वय ६२ वर्ष, रा. कारंजा याला ताब्यात घेवून गुन्हयासंबंधाने विचारपूस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवून त्याचे सोबत गुन्हा करण्यासाठी असलेला सहकारी कैलास भाउराव जाधव वय ३८ वर्ष, रा. सावंगी ता. दारव्हा जि. यवतमाळ याला सुध्दा ताब्यात घेवून त्याने विचारपुस दरम्यान गुन्हयाची कबुली दिल्यावरुन त्यांना पुढील कार्यवाही करीता पो.स्टे. नांदगाव खंडेश्वर याचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत, अमरावती ग्रामीण, श्री. किरण वानखडे पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. मुलचंद भांबुरकर, अमंलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोजोया, चालक पो.कॉ. प्रज्वल राउत यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट