इचलकरंजी पोलीसानी नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे MEPHENTERMINE SULPHATE INJECTION च्या बाटल्यांचा साठा केला जप्त..

0
WhatsApp Image 2025-07-19 at 5.37.51 PM
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

कोल्हापूर :

मा. पोलीस अधिक्षक श्री. योगेशकुमार साो,मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. आण्णासाहेब जाधव साो,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समिरसिंह साळवे साो,यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक श्री. महेश चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक पूनम माने, गुन्हे शोध पथकातील पो.हवा. अनिल पाटील, सुनिल पाटील (SDPO कार्या. इचलकरंजी), पो.ना. फिरोज बेग, पोलीस अंमलदार अमर शिरढोणे, बाजीराव पोवार, आदित्य दुंडगे, ताहीर शेख (SDPO कार्या. इचलकरंजी), चालक पो. हवा इंगवले

निष्पन्न आरोपीचे नावे

१] संग्राम अशोकराव पाटील वय २९, रा. वृंदावन अपार्टमेंट, श्रीपाद नगर इचलकरंजी ता. हातकणंगले

२] सचिन सुनिल मांडवकर वय २५, रा. यशवंत कॉलनी, इचलकरंजी ता. हातकणंगले

३] अभिषेक गोविंद भिसे वय २५, रा. लालनगर इचलकरंजी ता. हातकणंगले

गुन्हयाची थोडक्यात हकिकत-

मा. पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात “मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत” कारवाई करणेबाबत आदेशित केलेने आज रोजी इचलकरंजी पोलीस ठाणे हद्दीत काही लोक नशा करणेसाठी Mephentermine Sulphate Injection हे इन्जेक्शन विक्री करीत असलेची माहीती मा. समिरसिंह साळवे SDPO इचलकरंजी यांचे मार्फत प्राप्त होताच इचलकंरजी पोलीस ठाणेकडील वरील नमुद अधिकारी व अंमलदार यांनी सदर प्रतिबंधित इंजेक्शनचा साठा बाळगणा-या आरोपीत नामे संग्राम अशोकराव पाटील वय २९, रा. वृंदावन अपार्टमेंट, श्रीपाद नगर इचलकरंजी ता. हातकणंगले याच्या घराच्या बाहेर सापळा रचून मिळाले बातमीप्रमाणे वॉच केला असता आरोपीत नामे संग्राम अशोकराव पाटील याचे घरातून एक संशयित इसम बाहेर पडताना मिळून आल्याने त्यास छापा टाकून पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात Mephentermine Sulphate Injection ह्या इन्जेक्शनच्या एकूण ०५ बॉटल मिळून आलेने त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन सुनिल मांडवकर वय २५, रा. यशवंत कॉलनी, इचलकरंजी ता. हातकणंगले असे असलेचे सांगितले त्यानंतर लागलीच आरोपीत नामे संग्राम अशोकराव पाटील याच्या घरी शोध घेतला असता Mephentermine Sulphate Injection ह्या इन्जेक्शनच्या १८ बॉटलचा साठा मिळून आला.

त्यानंतर आरोपीत नामे संग्राम अशोकराव पाटील व सचिन सुनिल मांडवकर यांचेकडे अधिक चौकशी केली असता आरोपीत नामे अभिषेक गोविंद भिसे वय २५, रा. लालनगर इचलकरंजी ता. हातकणंगले याचेकडेदेखिल Mephentermine Sulphate Injection ह्या इन्जेक्शन चा साठा असलेचे सांगितलेने त्यास सदर प्रतिबंधीत इंजेक्शन घेवून येण्यास सांगून त्यास सापळा रचून पकडले असता त्याचेकडे प्रतिबंधीत इंजेक्शन च्या ७बॉटल मिळून आल्या त्यांनतर लागलीच त्याचे घरी शोध घेतला असता Mephentermine Sulphate Injection ह्या इन्जेक्शनच्या २२ बॉटल मिळून आले तसेच रोख रक्कम रु.६० हजार मिळून आलेने आरोपीत नामे संग्राम अशोकराव पाटील, सचिन सुनिल मांडवकर, अभिषेक गोविंद भिसे यांचेवर गुन्हा दाखल करणेत आला असून या गुन्हेगारी साखळीतील अन्य संशयित इसमांचा शोध सुरु आहे.

अशा प्रकारे नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे Mephentermine Sulphate Injection च्या बॉटलच्या साठा पकडून इचलकरंजी शहर परीसरातील अन्य संशयित व्यक्तीचा शोध सुरू असून या कारवाईमुळे अशी नशेची इंजेक्शन विकणा-या विक्रेत्यांची मोठी साखळी उद्वस्त करणेत इचलकरंजी पोलीसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. अशा प्रकारे शहरात नशेच्या इंजेक्शन अथवा अंमली पदार्थाचे सेवन किंवा विक्री च्या बाबतीत कोणतीही माहीती प्राप्त झालेस पोलीसांना गोपनीय माहीती देवून मिशन झिरो ड्रग्ज हे अभियान यशस्वीरित्या राबवण्यासाठी व अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक इचलकरंजी पोलीस ठाणे यांनी केले आहे.

एकुण हस्तगत मुद्देमाल :-

१. Mephentermine Sulphate Injection च्या एकुण ५२ बॉटल त्याची किंमत रू. २१,९६४/-

२. रोख रक्कम :- भारतीय चलनाच्या रू.५०० किंमतीच्या नोटा एकुण रु.६०,०००/-

३. मोबाईल :- एकुण ३ मोबाईल त्याची किंमत ४५,०००/-

४. दुचाकी मो. सायकल : एकुण २ त्याची किंमत १,१०,०००/-

असा एकूण रु. २,३६, ९६४/- किंमतीचा मुद्देमाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट