कोल्हापूर पोलीस मुख्यालय येथील ट्रॅफिक गार्डन येथे शालेय विदयार्थी यांना वाहतूक नियमा बाबत प्रबोधन

सह संपादक -रणजित मस्के
कोल्हापूर
मा. पोलीस अधीक्षक सो, कोल्हापूर श्री. योगेश कुमार, भा.पो.से. यांचे सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहर वाहतुक नियंत्रण शाखेकडून शालेय विदयार्थी यांना वाहतूक नियमाविषयी माहीती होणे करीता कोल्हापूर शहरातील व ग्रामीण भागातील शाळेतील विदयार्थी यांना सोमवार ते शनिवार अखेर दररोज परंतु सर्व प्रकारच्या सुटटीचे दिवस वगळुन इतर दिवशी पोलीस मुख्यालय येथील ट्रॅफिक गार्डन मध्ये आमंत्रित करण्यात येणार आहे. ट्रॅफिक गार्डन येथे सर्व विदयार्थ्यांना दळण-वळण, रस्ते सुरक्षा, वाहनां बाबत साक्षर बनविणे, सिग्नलची माहीती देणे तसेच बी.डी.डी.एस. यांचे मार्फत श्वान पथकाचे कार्य, हत्यारा बाबतची माहीती देण्यात येणार आहे.



त्याप्रमाणे आज दिनांक १४/०७/२०२५ रोजी सकाळी ११.३० वा. ते १३.३० वा. कालावधीमध्ये पोलीस मुख्यालय येथील ट्रॅफिक गार्डन येथे ताराराणी विदयापीठ शाळेचे ६० विदयार्थी यांना आमंत्रित केले होते सर्व विदयार्थी यांना मा. पोलीस अधीक्षक सो यांनी वाहन चालविण्याचे अनुषंगाने, अपघात होणार नाही या करीता घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडील बीडीडीएस श्वान पथकातील श्वानांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले, पोलीस दलाकडील हत्यारांची माहीती देणेत आली तदनंतर वाहतूक शाखे कडील पोलीस अंमलदार यांनी ट्रॅफिक गार्डन येथील सिग्नल (प्रतिकृती) प्रत्यक्षात सुरु करुन सिग्नल मधील लाल पिवळा व हिरवा या लाईटची माहीती व सिग्नल चौकात घ्यावयाची दक्षता, झेब्रा क्रॉसिंग, रस्त्यावरुन प्रवास करीत असताना येणारे ओव्हरब्रिज वर वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, बोगदयामधुन ओव्हरटेक करु नये तसेच विविध ट्रॅफिक साईन चिन्हांची माहीती देण्यात आली.
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून जिल्हयातील सर्व शाळा तसेच नागरीकांना आवाहन करण्यात येते की, शालेय विदयार्थी यांना वाहतूक नियमाविषयी माहीती होणे हे त्यांच्या भविष्यकाळा करीता गरजेचे आहे तरी सर्व नागरीकांनी आपल्या पाल्यास त्यांचे शाळेमार्फत ट्रॅफिक गार्डन येथे उपस्थित ठेवावे ही विनंती.
सदर कार्यक्रमाचे मा. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर श्री. योगेश कुमार, (भा.पो.से.) यांनी फ्लॅग दाखवुन उदघाटन केले, सदर कार्यक्रमास, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. डॉ. बी. धीरज कुमार, (भा.पो.से.), मा.पोलीस उपअधिक्षक (गृह) सुवर्णा पत्की मॅडम, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत, राज्य कोषाध्यक्ष श्री. साळवी, चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सचिव श्री. जयेश ओसवाल व सदस्य किरण ओतारी असे उपस्थित होते,
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर वाहतुक नियंत्रण शाखा प्रभारी पो. नि. श्री. नंदकुमार मोरे यांनी केले व उपस्थितांचे आभार आरएसपी चे जिल्हा समादेशक श्री. श्रीकांत मोरे यांनी मानले.