अवैधरित्या सावकारी करून जनतेची पिळवणूक करून लुट करणा-या पेण तालुका येथील सावकारांवर रायगड पोलिसांची कारवाई

सह संपादक -रणजित मस्के
रायगड

रायगड जिल्हा पोलिस दलाच्या पोलिस अधिक्षक श्रीमती आँचल दलाल मॅडम यांना पेण तालुका जिल्हा रायगड येथील सावकारी जाचाला व पिळवणूकीला कंटाळलेले काही त्रस्त नागरीक भेटले. त्यांनी पेण शहर येथे राहणारे परवानाधारक सावकार 1) श्री. सूर्यकांत जोमा पाटील वय-70 वर्षे 2) श्री. भरत सूर्यकांत पाटील वय-35 वर्षे दोन्ही राहणार रूम नं. 301, 302, आमंत्रण बिल्डींग, गोदावरीनगर, चिंचपाडा, ता.पेण जिल्हा रायगड हे अवैधरित्या सावकारी व्यवसाय करून, जनतेची पिळवूक करून लुट करीत असल्याच्या तक्रारी केल्या. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी त्यांचे विरोधात लेखी तक्रारी दिल्याने सदरबाबत मा. पोलिस अधिक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी पोलिस निरीक्षक श्री. मिलींद खोपडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, अलिबाग रायगड यांना ‘सहाकार पणन व वस्त्रोदयोग’ अलिबाग या विभागशी संपर्क करून तात्काळ पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
श्री. प्रमोद जगताप, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अलिबाग जिल्हा रायगड यांना प्राप्त तक्रारीची माहीती दिली. त्यानंतर सपोनि/भास्कर जाधव व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा स्टाफ संयुक्तरित्या सहकार विभागील अधिका-यांसह वेगवेगळी पथके सदर कारवाईकामी तयार करून दिनांक 18/7/2025 रोजी पेण शहर येथे राहणारे परवानाधारक सावकार 1) श्री. सूर्यकांत जोमा पाटील वय 70 वर्षे 2) श्री. भरत सूर्यकांत पाटील वय 35 वर्षे यांचे राहते घर रूम नं.301, 302, आमंत्रण बिल्डींग, गोदावरीनगर, चिंचपाडा, पेण, ता. पेण जिल्हा रायगड तसेच हॉटेल रायगड गोमांतक, पेण, ता. पेण, जिल्हा रायगड या ठिकाणी एकाचवेळी गोपनियता राखुन छापे मारण्यात आले. सदर छापा कारवाईमध्ये सहकारी संस्था विभागाने पंचासमक्ष सविस्तर पंचनामे केले असुन त्यादरम्यान तेथुन सदर सावकारांनी कर्जदारांकडुन लिहुन घेतलेल्या वचनचिठ्ठया, धनादेश तसेच इतर संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. सदरबाबतची पुढील कायदेशीर कारवाई श्री. सुभाष काळे, सहा. निबंधक, सहकारी संस्था, पेण हे त्यांच्या अधिकारीतेत करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलिस अधिक्षक सो, आँचल दलाल मॅडम यांचे आदेशाने व मा. अपर पोलिस अधिक्षक श्री. अभिजीत शिवथरे यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे, पोलिस निरीक्षक मिलींद खोपडे, सहा. पोलिस निरीक्षक भास्कर जाधव, सहा. पोउपनि प्रसाद पाटील, सहा. पोउपनि प्रसन्ना जोशी, पोहवा/2233 मोरेश्वर ओंबळे, मपोहवा/123 अस्मिता म्हात्रे, मपोहवा/34 रेखा म्हात्रे, पोहवा/2388 सचिन वावेकर, मपोहवा/135 झुलीता भोईर, पोशि/2030 बाबासो पिंगळे, पोशि/454 अक्षय जगताप, पोशि/2216 ईश्वर लांबोटे, पोशि/678 ओमकार सोंडकर या पोलिस पथकाने केलेली आहे.