अल्पवयीन मुलीस काम देण्याचे आमिष दाखवुन आर्थिक फायदयासाठी वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणा-या दोघांना केले जेरबंद..

सह संपादक -रणजित मस्के
पुणे

दिनांक १०/०७/२०२५ रोजी फिर्यादी यांनी वातील निर्भया हिला तिची मावस बहिण नामे तमन्ना ऊर्फ पारुल मुक्तार शेख, वय अंदाजे २५ वर्षे, हिने खोटे बोलून, बांगलादेश येथुन बेंगलोर येथे बोलावून, बेंगलोर येथे येण्यास भाग पाडून तेथे आल्यावर धमकावून तेथे एका इसमाच्या मार्फतीने स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी वेश्या व्यवसाय करवुन घेतला. तसेच सदर इसनाच्या मार्फतीने निर्भया हिस बेंगलोर वरुन बुधवार पेठ, पुणे येथे येण्यास भाग पाडून, मित्र नामे अभिषेक प्रकाश संथेवेनुर याच्या सहभागाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडले आहे. तेव्हा निर्भवा हीने सदर वाईट काम करण्यासाठी नकार दिला असता, तिला एका रुममध्ये कोढून ठेवून, तिला हाताने व बेल्टने मारहाण करुन, शिवीगाळ करुन गायब करण्याची धमकी दिली. सदर बाबत सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. २८५/२०२५ मा.न्या.सं.क. १४२,१४३ (२),११८ (१),११५(२), ३ (५), बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,१७ पीटा अॅक्ट ४,५,६ पारपत्र (भारतामध्ये प्रवेश) १९५० चे कलम ३(a), ६(a) सह विदेशी व्यकती अधिनियम १९४६ चे कलम १४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याचा तपासात वरील महीला व इसनास ताब्यात घेवुन त्यांची नावे पत्ता विचारता त्याने त्याचे नाव १) अभिषेक प्रकाश संथेवेजुर वय २२ वर्ष, गोपानकोषा, सित्तप्पा मंदिराजवळ, हुबळी, धारवाड, कर्नाटक २) तमन्ना मुख्तार शेख रा. मामा फेंके येथे पहिल्या मजल्यवर खादीजा खातुन यांचे घरी भाडेतत्वावर पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता सदर गुन्हाची कबुली दिल्याने सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्विन प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२, पुणे शहर श्री. मिलींद मोहीते, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर श्री. राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस उपनिरीक्षक कल्पना काळे, पोलीस अंमलदार फिरोज शेख, सद्दाम हुसेन फकिर, मिरा किंद्रे व तपास पथकाचे अंमलदार यांनी केली आहे.