दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ पुणे शहर यांनी वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपीला केले जेरबंद

सहसंपादक- रणजित मस्के
पुणे

दिनांक ११/०७/२०२५ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १. गुन्हे शाखा मधील पोलीस अधिकारी व अंमलदार हे वाहनचोरी प्रतिबंधचे अनुषंगाने हद्दीत पेट्रोलींग करीत असताना तसेब फरासखाना पोलीस स्टेशन, गु.र.नं.१३९/२०२५, भा.न्या.सं.क. ३०३ (२) वा गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस अंमलदार प्रदीप राठोड व शिवाजी सातपुते यांनी सी.सी. टि.व्ही फुटेजव्दारे आरोपीची माहिती काढली. त्यांना सदरचा आरोपी हा संगमवाडी पार्किंगजवळील स्मशानभुमी जवळ वरील दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या ऑटो रिक्षासह उभा असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळवली. सदर माहितीच्या अनुषंगाने वरील नमुद अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन आरोपी नामे सुरज बाबुराम पांडे, वय ३५ वर्षे, रा. मुळगाव पाठककापुर्वा, पो. अंधियारी, ता. कुंडा, जि. प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेश सध्या रा. पुणे (फिरस्ता) यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने दाखल गुन्ह्याची कबुली दिली. सदर आरोपीकडुन ४०,०००/-रु.किं. ची ०१ तीन चाकी ऑटो रिक्षा हस्तगत करुन फरासखाना पोलीस स्टेशनकडील वाहनबोरीचा गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कारवाई ही बा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे (अति. कार्य.) श्री. विवेक मासाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा श्री. संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रविण काळुखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा कावडे तसेच पोलीस अंमलदार प्रदीप राठोड, गणेश ढगे, शिवाजी सातपुते, अजित शिंदे, धनंजय ताजणे, बाळु गायकवाड, निनाद माने, दत्तात्रय पवार, महेश पाटील, साईकुमार कारके, अमित गद्रे, नारायण बनकर यांनी केली आहे