अमली पदार्थ विकणाऱ्यांच्या मुसक्या आवळणारे डीसीपी श्री अतुल झेंडे हे युवा सेनेच्या पदाधिकार्यांकडून सन्मानित..

कल्याण ठाणे
प्रतिनिधी- विश्वनाथ शेनोय


देशाची भावी पिढी उद्ध्वस्त करण्यासाठी तरूणाईला अंमली पदार्थांच्या खाडीत लोटण्याचा आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांना पोलीस विभागाचं सिंघम डीसीपी अतुल झेंडे यांना युवासेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष जितेन पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांची भेट घेऊन दोन्ही अधिकाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.या प्रसंगी युवसेनेचे कल्याण जिल्हा सचिव राहूल म्हात्रे, उपजिल्हाध्यक्ष प्रथमेश पाटील, भूषण यशवंतराव, डोंबिवलीचे शहराध्यक्ष सागर जेधे, कल्याण पश्चिमचे शहराध्यक्ष सुजित रोकडे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सागर दुबे, जय देसले, विक्की जोशी, चिन्मय पाटील, सुचेत डामरे उपस्थित होते. काही दिवसा अगोदर कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या निळजे गावातील वर्टेक्स विला सोसायटीत मानपाडा पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईमुळे तब्बल २ कोटी १२ लाखांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. या कारवाईत आफ्रिकन ड्रग्स माफियाला अटक करून आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट उघडकीस आणले. आठवडाभरात मानपाडा पोलिसांनी सलग दोन मोठ्या कारवाया करत ४ कोटींहून अधिक किंमतीचे एमडी ड्रग्स हस्तगत करून ५ आरोपींना अटक करण्यात आले, ही अतुलनीय यशस्वी मोहीम असल्याचा जिल्हाध्यक्ष जितेन पाटील यांनी सांगितला. युवक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा करत पोलिस पथकाचे अभिनंदन केले. युवा पिढीला नशेच्या विळख्यात जाण्यापासून वाचविण्यासाठी पोलिसांनी घेतलेली तत्परता, सजगता आणि धाडस अभिमानास्पद आहे. या कार्यात युवासेना नेहमीच पुढाकार घेऊन जनजागृती करेल, असे आश्वासन देऊन ड्रग्जमुक्त समाज आणि सशक्त युवा हेच आपले उद्दिष्ट असल्याचे जिल्हाध्यक्ष जितेन पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.